शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

कधीही झोपा, कधीही उठा असं करता? मग तुमचा दिवस वाईटच जाणारच

By admin | Updated: June 8, 2017 18:23 IST

वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठत असाल तर तुम्हाला मूडबदल नावाचा आजार छळतोच.

- निशांत महाजनआपण तरुण असतो, बिन्धास्त असतो. रात्री जागरणं करतो, सिनेमे पाहतो, पार्ट्या करतो, गप्पा मारत बसतो, जमलं तर अभ्यास करतो. आणि पहाटे कधीतरी झोपतो, दुपारी उठतो. कधी तर संध्याकाळीही उठतो. काहीजण तर बारा वाजून गेल्याशिवाय उठतच नाहीत. हे सारं करणं अनेकांना ‘कूल’ वाटतं. भल्या पहाटे उठून खूडबूड करणारे आईबाबा तर महाबोअर वाटतात. लवकर उठणं आवडत नाही. आणि उठलेच कधी तर उठून करणार काय असा प्रश्न पडतो. पण आता जीवनशैलीचा अभ्यास असं म्हणतो की, जर तुम्ही लवकर झोपेतून उठत नसाल किंवा रोजच तुमच्या झोपेच्या वेळा बदलत असतील तर तुमचे जबरदस्त मूडस्विंग्ज होतात. आणि तुमचे दिवसच्या दिवस वाईट जातात. आणि त्यानं तुमच्या करिअरवर कायमचा वाईट परिणाम होतो.

मेसेच्युसेट्ेस इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगने केलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण पुढं आले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्याच मुलांचं एक सर्व्हेक्षण केलं. या मुलांना फक्त त्यांच्या झोपेच्या वेळेच्या नोंदी सलग ३६ दिवस ठेवायला सांगण्यात आल्या. त्यातून एक रेकॉर्ड तयार झालं जे असं दाखवतं की रोज एकाच वेळी झोपणारे आणि एका ठराविक वेळीच उठणारे तरुण मुलं अत्यंत कमी आहेत. बाकीचे सारे रोज वाट्टेल तेव्हा झोपतात, वाट्टेल तेव्हा उठतात. अनेकांचं झोपेचं ठरलेलं असं काही शेड्युल नाहीत. त्यातून या मुलांचं झोपेचं चक्र बिघडतं.त्यातून पचनाचं तंत्रही बिघडतं. त्याहून वाईट म्हणजे ज्यांचं झोपेचं चक्र बिघडतं, त्यांचा मूड अनेकदा दिवसभर चांगला नसतो. ते चिडचिडतात. उदास असतात.कधी आक्रमक असतात. त्यांचे प्रचंड मूड स्विंग्ज ोतात. आणि त्यांचं कामावरचं लक्षही उडालेलं असतं. परिणाम म्हणून त्यांच्या दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो. आणि एकूण प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हा अभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.