शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सकाळसोबत संध्याकाळचा व्यायामही ठरतो फायदेशीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 11:50 IST

कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा.

कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. खरं तर आपल्यापैकी अनेकजणांचा असा समज आहे की, एक्सरसाइज, वर्कआउट आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीचा फायदा फक्त सकाळच्यावेळीच होतो. पण याच समजाच्या अगदी विरूद्ध बाब संशोधकांनी संशोधनातून शोधली आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, संध्याकाळी केलेली एक्सरसाइजही सकाळच्या एक्सरसाइज एवढीच फायदेशीर असते. 

वेगवेगळ्या वेळी होतो वेगवेगळा परिणाम

सेल मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, एक्सरसाइजचा शरीरावर होणारा परिणाम हा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेच्या आधारावर वेगवेगळा असू शकतो. डेनमार्कमध्ये कोपेनहेगन युनिवर्सिटीमधील असोशिएट प्रोफेसर जोनास थ्यू ट्रीबक यांनी सांगितले की, 'सकाळी आणि संध्याकाळी करण्यात आलेल्या एक्सरसाइजचा परिणामांमध्ये एक महत्त्वपूर्ण अंतर दिसून येते. 

शरीरातील ऊर्जा वाढवतं

ट्रीबक यांनी सांगितल्यानुसार, 'सकाळी करण्यात आलेली एक्सरसाइज स्नायूंच्या पेशींमध्ये जीन प्रोग्रा सुरू करते. ज्यामुळे ते अधिक प्रभावी होण्यासोबत फॅट आणि शुगरची मेटाबॉलिज्मच्या प्रक्रियेमध्येही सक्षम असतात. दुसरीकडे संध्याकाळी एक्सरसाइज केल्याने उंदरांच्या स्नायूंमध्ये मेटाबॉलिज्म प्रोसेस वाढत असल्याचे दिसून आले. परंतु तेच सकाळी व्यायाम केल्याने थोड्या वेळासाठीच शरीरात ऊर्जा तयार होण्याचे प्रमाण वाढते. 

शरीराच्या बॉडी क्लॉकला नियंत्रित करतं संशोधकांनी स्नायूंच्या पेशींमध्ये होणाऱ्या अनेक परिणामांचा सखोल अभ्यास केला. ज्यामध्ये ट्रांसक्रिप्शनल प्रतिक्रिया आणि मेटाबॉलिज्मवर होणाऱ्या परिणामांचाही समावेश होता. या परिणामांनुसार, सकाळी व्यायाम केल्यानंतर दोन्ही क्षेत्रांमधील प्रतिक्रिया अधिक मजबुत होतात आणि एका केंद्रिय तंत्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. ज्यामध्ये प्रोटीन एचआयएफ 1-अल्फाचा समावेश करण्यात आला होता. जे थेट शरीराचं बॉडी क्लॉक नियंत्रित करण्याचं काम करतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी एका संशोधनातून सिद्ध करण्यात आल्या असून या फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स