थोडक्यात महत्त्वाचे मस्ट
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
लायन्स क्लब ऑफ नागपूर मेडिकोजची नवीन कार्यकारिणी
थोडक्यात महत्त्वाचे मस्ट
लायन्स क्लब ऑफ नागपूर मेडिकोजची नवीन कार्यकारिणी(फोटो रॅपमध्ये आहे)नागपूर : लायन्स क्लब नागपूर मेडिकोजच्या -२०१५-१६ च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी एका हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. मॅक्सीलो फेशियल सर्जन डॉ. धनंजय बरडे यांनी अध्यक्षपदाची तर नेत्ररोग सर्जन डॉ.विरल शहा यांनी सचिव पदाची सूत्रे हाती घेतली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर व प्रतिभा अधलखिया उपस्थित होते. ग्रामीण भागात लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन आ. डॉ. माने यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष संजय बरडे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण वैरागडे, डॉ. बी.चंदनखेडे, उदय सोनटक्के, सहसचिव डॉ. अरविंद बुटले, सहकोषाध्यक्ष डॉ. गिरीश भुयार यांच्यासह डॉ. प्रशांत झाडे, डॉ. देवेंद्र जिल्हारे, डॉ. देवेंद्र कैकाडे यांनी आपल्या पदाची जबाबदारी घेतली. आभार डॉ. शहा यांनी मानले.