शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे तारुण्यातचं दिसू लागाल म्हातारे, वेळीच जाणून घ्या बचावाच्या सोप्या टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:12 IST

सध्याच्या तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव हा त्यांच्या त्वचेवरही (Skin) होतो.

आपण वयाने कितीही तरुण असलो तरी आजकालच्या जीवनशैलीमुळे तारुण्य काही चेहऱ्यावर टिकत नाही. चेहऱ्यावर (Face) ग्लो दिसावा म्हणून अनेक तरुण तरुणी अनेक गोष्टी करतात. मात्र, त्यानंतरही काही फरक पडत नसल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात. मात्र यासाठी मुळ कारणावर उपचार केला पाहिजे हेच मुळात अनेकांना कळत नाही. आपल्या त्वचेवरचा ग्लो हरवण्यामागचं मुळ कारण आहे मानसिक तणाव.

सध्याच्या तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव हा त्यांच्या त्वचेवरही (Skin) होतो. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर तणावामुळे ड्रायनेस, रिंकल्‍स, एक्‍ने आणि पिंपल्‍स यायला लागतात. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात.

ज्यावेळी आपण मानसिक तणावातून जात असतो. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर याचे काही वाईट परिणाम होत असतात. जसे की आपण तणावात असताना आपल्या शरिरातील हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्याच्या विपरित परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो. त्याचबरोबर आपण नेहमी कामात असताना आपल्या चेहऱ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहरा स्वच्छ राहत नाही, आणि परिणामी त्यामुळे चेहरा खराब होतो. जेव्हा आपण तणावात असतो त्यावेळी आपल्या शरिरातील कॉटिजॉल नावाचे हार्मोन्स बाहेर पडतो. त्यामुळे चेहरा चिकट होतो. त्यातून एक्‍ने होण्याची दाट शक्यता असते.

काही संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, तेव्हा झोप नीट होत नाही, त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या खालचा भाग काळा पडायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे तेज कमी होते. या तणावाचा प्रभाव हा आपल्या त्वचेच्या हायड्रेशन आणि नॅचुरल नॅरिशमेंटवरही पडतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मऊपणा कमी होऊन त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर मानसिक तणावामुळे आपल्या डोक्यावरील केसगळती वाढते. त्यामुळे टक्कल पडण्याचाही धोका संभवतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स