शिक्षण विस्तार अधिकार्याचे स्वाइन फ्लूने निधन
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:16+5:302015-03-20T22:40:16+5:30
बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

शिक्षण विस्तार अधिकार्याचे स्वाइन फ्लूने निधन
ब रामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडके यांना शनिवारी (दि. १४) थंडी-तापाचा त्रास होत असल्याने सांगवी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेव्हा विषयमज्वर झाल्याचे निदान करण्यात आले होते. उपचारांनतर त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी तब्येत बिघडल्यानंतर, त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.१८)त्यांना स्वाइन फ्लू आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची किडनीही निकामी झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर दोडके यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दोडके हे दहावी परीक्षेसाठी बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक होते. त्यामुळे १३ केंद्रांतील विद्यार्थ्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. या दरम्यान परीक्षा सुरू असल्याने शारीरिक त्रास जाणवूनही त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केले. ----------