शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 07:25 AM2022-02-12T07:25:24+5:302022-02-12T07:25:51+5:30

मेंदूत लपणारा विषाणू - इबोला संसर्ग जनावरांपासून वा या विषाणूची लागण झालेल्या लोकांकडून होतो.

Ebola; Deadly viruses, new study reveals | शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

googlenewsNext

सध्या कोरोना विषाणूचा झाकोळ जगभरात आहे. मात्र, आजही काही विशिष्ट विषाणू असे आहेत की ज्यांच्यावर अक्सीर इलाज सापडलेला नाही. त्यातलाच एक म्हणजे इबोला.इबोला विषाणूची लागण प्राणघातक असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा विषाणू शरीरात दबा धरून बसतो. जुनाट असा हा विषाणू आहे.

इबोला विषाणूविषयी...

इबोला विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. १९७६ या विषाणूचा शोध लागला. सुदान आणि काँगो या आफ्रिकी देशांमध्ये तो मोठ्या प्रमाणात फैलावला. काँगोतील इबोला या नदीवरून त्याचे नामकरण करण्यात आले.

संसर्ग कसा होतो?

इबोला संसर्ग जनावरांपासून वा या विषाणूची लागण झालेल्या लोकांकडून होतो. अलीकडेच सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन जर्नलमध्ये इबोलाविषयी एक नवे संशोधन प्रकाशित झाले. इबोला कैक वर्षे माणसाच्या मेंदूत लपून राहू शकतो आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर शरीरावर हल्ला करू शकतो, असे या संशोधनात स्पष्ट झाले.

आफ्रिकेत अधिक फैलाव

इबोलाचा अभ्यास करणारे संशोधक जियानकुन जेंग यांनी इबोलाच्या फैलावाचे प्रमाण आफ्रिकेत अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. आफ्रिकेच्या पश्चिमेकडील देशांमध्ये इबोला व्यापक प्रमाणात पसरला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीला इबोलाची लागण झाली होती. त्याच्यामुळे या विषाणूचा फैलाव होत असल्याचा जेंग यांचा दावा आहे. इबोलाचा अभ्यास करणारे संशोधक जियानकुन जेंग यांनी इबोलाच्या फैलावाचे प्रमाण आफ्रिकेत अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. आफ्रिकेच्या पश्चिमेकडील देशांमध्ये इबोला व्यापक प्रमाणात पसरला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीला इबोलाची लागण झाली होती. त्याच्यामुळे या विषाणूचा फैलाव होत असल्याचा जेंग यांचा दावा आहे.

जागतिक आव्हान

इबोलाची लागण झाल्यास मेंदूला सूज येते. तसेच सणकून ताप येतो. इबोला केवळ मेंदूतच नव्हे तर डोळ्यांच्या पेशींमध्येही लपून राहू शकतो. २०२१ मध्ये इबोलाचा तीन वेळा फैलाव झाला होता. हा एक घातक विषाणू असून त्याचा अटकाव हे जागतिक आव्हान असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.

Web Title: Ebola; Deadly viruses, new study reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Ebolaइबोला