शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात कानात इन्फेक्शन होण्याचा वाढतो धोका, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:50 IST

Ear infection पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं. 

Ear infection : नुकताच पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यातच वेगवेगळे आजारही होतात. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे कानात फंगल, बॅक्टेरिअल आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका. या दिवसात फंगल आणि बॅक्टेरिया सहजपणे वाढतात. अशात शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं. 

कानात इन्फेक्शन होण्याचं कारण....

कानात इन्फेक्शन होण्याची कारणे वेगवेगळी असतात. इन्फेक्शन कानाच्या वरच्या भागातही होतं आणि कानाच्या आतही होतं. काही कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.

1) पावसात भिजल्याने - पावसात भिजण्याचे नुकसानही खूप आहेत. पावसात भिजल्याने कानात इन्फेक्शन हे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. खासकरून बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इनफ्लुएंजा. हे सामान्यपणे तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या ब्लॉकेजमुळे होतं. ज्यामुळे कानात एक द्रव्य तयार होतं. यूस्टेशियन ट्यूब एक छोटी ट्यूब असते जी तुमच्या कानापासून थेट गळ्यापर्यंत जाते.

2) साबणाच्या पाण्यामुळे - पावसाळ्यात आधीच सगळीकडे ओलावा असतो. अशात साबणाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. या पाण्यामुळे कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. जे नंतर आतपर्यंत जातं.

3) स्वीमिंगमुळे - पावसाळ्यात स्वीमिंग पूलसारखी ठिकाणं फंगल आणि बॅक्टेरियासाठी प्रजननाची स्थळं असतात. अशात स्वीमिंग पूलच्या पाण्यामुळे तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होऊ शकतं. या इन्फेक्शनमुळे कानात खाज आणि वेदना होऊ शकतात. याने नंतर समस्या वाढते. त्यामुळे पावसाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करणं टाळलं पाहिजे.

4) थंड पदार्थ खाल्ल्यामुळे - थंड पदार्थ खाल्ल्यामुळेही तुम्हाला कानात इन्फेक्शन होऊ शकतं. हे संक्रमण एडीनोइडमधून कानात होतं. तुमचे एडेनोइड तुमच्या नाकाच्या मागे तोंडाच्या आत वरच्या भागातील ग्रंथी आहेत. ज्या तुमच्या शरीराला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. संक्रमण या ग्रंथींमधून तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या आजूबाजूला पसरू शकतं. याने कानात इन्फेक्शन होतं.

काय दिसतात लक्षणं?

- कानात झोपताना वेदना होणे

- झोप न लागणे

- आवाज ऐकणे किंवा प्रतिक्रिया देण्याची समस्या

- ताप

- कानातून द्रव्य पदार्थ निघणे

- डोकेदुखी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य