शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय, चूक की बरोबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 11:32 IST

अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे.

(Image Credit : EVOKE.ie)

अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे. काही लोक जेवण करतानाही चहा पितात. त्यामुळे चहा हा नेहमीच वादाचाही मुद्दा राहिला आहे. तर काही रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, चहा पचन तंत्रासाठी चांगलं असतं. तेच काही रिसर्चनुसार, चहामध्ये असणारं तत्व कॅफीनमुळे आपलं नुकसान होतं. चला जाणून घेऊ याबाबत जरा सविस्तर... 

पचन तंत्रावर चहाचा प्रभाव

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, काही रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जेवण करताना किंवा जेवण केल्यावर चहा प्यायल्याने पोटात तयार झालेली गॅस बाहेर येण्यास मदत मिळते. ज्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. पण हेही लक्षात ठेवायला हवं की, सगळ्याच प्रकारचा चहा याबाबत फायदेशीर ठरत नाही. ग्रीन टी, हर्बल टी जसे की, आल्याचा चहा ज्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोलीफेनॉलचं प्रमाण अधिक असतं. हे चहा आपल्या पचन तंत्रासाठी फार फायदेशीर असतात. 

(Image Credit : Her.ie)

चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने हे शक्तीशाली अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्याने पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.

जेवणानंतर चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान

१) काही रिसर्च हे सांगतात की, चहामध्ये असणारं  फेनोलिक तत्व आपल्या पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं. 

(Image Credit : INLIFE Healthcare)

२) असे म्हटले जाते की, जर जेवणासोबत तुम्हला चहा हवा असेल आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला होणारा त्रास टाळला जाईल.

३) आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. असंही आढळलं आहे की, जेवणादरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटचिनची कमतरता होते. 

(Image Credit : Mamiverse)

४) कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा आपल्या अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

५) तुम्हाला जेवणासोबत चहा प्यायचाच असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता. कारण याने पचनक्रियेला मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य