(Image Credit : jangkau.com)
भलेही डोकेदुखी, डिप्रेशन आणि टाइप-२ डायबिटीससारख्या आजारांमध्ये कॉफी पिणे फायदेशीर असेल आणि कॉफी तुमचं कितीही आवडतं पेय असो. पण यात जराही दुमत नाही की, कोणत्याही गोष्टी अति करणं हे चुकीचंच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून याचा खुलासा करण्यात आला आहे. जर तुम्ही दिवसातून ६ कपांपेक्षा जास्त कॉफी सेवन करत असाल तर तुम्हाला हृदयाशी निगडीत समस्या होण्याचा धोका २२ टक्क्यांनी वाढतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.
हृदयरोग आणि कॉफीच्या सेवनाचा संबंध
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार, कार्डिवस्क्युलर डिजीज म्हणजेच हृदयाशी संबंधित आजार जगभरात लोकांच्या मृत्यूचं कारण ठरत आहे. मात्र हे आजार रोखले जाऊ शकतात. एकट्या ऑस्ट्रेलियामध्येच प्रत्येत सहावी व्यक्ती हृदयरोगाने प्रभावित आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्रिसिशन हेल्थचे अभ्यासक डॉ. ऐंग जोऊ आणि एलिना हायपोनेन यांनी यया रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, फार जास्त वेळ कॉफीचं सेवन करणे आणि हृदयरोगांचं काय कनेक्शन आहे. या रिसर्चमधून हे सिद्ध केलं आहे की, कॅफीनच्या जास्त सेवनामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो. हा हृदयासंबंधी आजारच आहे.
हेल्दी हार्टसाठी कॉफी टाळा
हायपोनेन सांगतात की, 'कॉफीचं सेवन जगभरात स्टिम्यूलेंट म्हणजेच उत्तेजकच्या रूपात केलं जातं. कॉफी प्यायल्याने झोप उडते, तुम्हाला फ्रेश वाटतं, एनर्जी लेव्हल वाढते आणि फोकस करण्यासही मदत मिळते. पण लोक नेहमी विचारतात की, किती कॉफी सेवनाला जास्त कॅफीन सेवन केलं असं मानायचं? अशात हृदय आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन कमी करा आणि एका दिवसात ६ कप पेक्षा जास्त कॉफी घेऊ नका. आमच्या रिसर्चमध्ये आम्ही जो डेटा एकत्र केलाय, त्यानुसार ६ कपांपेक्षा अधिक कॉफीचं सेवन केल्यास कार्डिओवस्क्युलर सिस्टीमवर नकारात्मक प्रभाव पडू लागतो'.