शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

Health tips: फ्रीजमधील थंड पाणी गरमीत देत गारवा पण याचे आहेत इतके धोके की समजल्यावर घाम फुटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:38 IST

थंड पाणी किंवा थंड पेये तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित करून तुमच्या पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. याशिवाय पचनक्रियेदरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतही अडथळा निर्माण करतात.

थंड पाणी किंवा थंड पेये तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित करून तुमच्या पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. याशिवाय पचनक्रियेदरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतही अडथळा निर्माण करतात. शरीराचे सामान्य तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते, परंतु जेव्हा तुम्ही काही कमी तापमानाचं खाता-पिता तेव्हा तुमचे शरीर या तापमानाचे नियमन करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करून त्याची भरपाई करते. ही अतिरिक्त ऊर्जा जी सध्या तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते ती मुळात पचन आणि पोषकद्रव्ये शोषून घेण्याच्या प्रक्रियेत वापरली जाते. यामुळेच पाणी नेहमी खोलीच्या तापमानावर ठेवून पिण्याचा सल्ला दिला जातो.

लठ्ठपणा-हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, थंड पाण्यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी घट्ट होते, त्यामुळे चरबी जाळण्यात समस्या निर्माण होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थंड पाणी पिऊ नका. कमीतकमी थंड पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितके गरम किंवा सामान्य पाणी प्या. गरम पाणी तुमच्या शरीरातील चरबी सहज काढून टाकू शकते.

पचन खराब -जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ, पोट फुगणे यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. जेव्हा थंड पाणी शरीरात जाते तेव्हा ते शरीराच्या तापमानाशी जुळत नाही. अशा परिस्थितीत थंड पाणी शरीरात पोहोचते आणि पोटात असलेले अन्न पचणे कठीण होते.

बद्धकोष्ठता-फ्रीजमधील थंडगार पाणी प्यायल्याने मोठे आतडे आकुंचन पावतात, त्यामुळे आतडे आपले काम नीट करू शकत नाही. मोठ्या आतड्याच्या खराब कार्यामुळे, व्यक्तीचे पोट साफ होत नाही आणि त्याला बद्धकोष्ठतेची त्रास सुरू होतो.

घसा खवखवणे-फ्रीजमधलं थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवल्याचंही तुम्ही बहुतेक लोकांना ऐकलं असेल. लक्षात ठेवा की जास्त थंड पाणी पिणे कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे त्यांना घसा खवखवणे, खोकला किंवा इतर कोणत्याही संसर्गाचा त्रास होऊ शकतो.

डोकेदुखी आणि सायनसचा त्रास -जास्त थंड प्यायल्याने 'ब्रेन फ्रीझ'ची समस्या उद्भवू शकते. बर्फाचे पाणी पिल्याने किंवा जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. यामध्ये थंड पाणी मणक्याच्या संवेदनशील नसांना थंड करते, त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे पुढे डोकेदुखी आणि सायनुसायटिस होऊ शकते.

हृदय गती कमी -आपल्या शरीरात एक व्हॅगस मज्जातंतू आहे. जो मानेद्वारे हृदय, फुफ्फुस आणि पाचन तंत्र नियंत्रित करते. तुम्ही जास्त थंड पाणी प्यायले तर नसा जलद थंड होतात आणि हृदयाचे ठोके आणि नाडीची गती कमी होते. यामुळे हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

ऊर्जा पातळी खालीथंड पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि शरीरात जास्त काम करण्याची क्षमता राहत नाही. खरं तर थंड पाणी शरीरातून चरबी सोडू शकत नाही, ज्यामुळे शरीर सुस्त राहते आणि ऊर्जा पातळी खाली जाते.

पाणी कसे प्यावेउन्हाळ्यात, गरम किंवा कोमट पाणी पिण्याऐवजी आपण खोलीच्या तपमानावर किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची तहानही भागेल आणि तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही. एरव्ही ऋतुमध्ये कोमट पाणी प्यावे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स