शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झोपण्यापूर्वी कॉफी घेताय? थांबा, असं करणं घातक ठरू शकतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 11:37 IST

काही लोकांना बिछान्यावर पडल्या पडल्या झोप येते. पण काही लोकांना झोप येतच नाही. परिणामी याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावर होतो.

काही लोकांना बिछान्यावर पडल्या पडल्या झोप येते. पण काही लोकांना झोप येतच नाही. परिणामी याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावर होतो. दररोज 7 ते 9 तासांची झोप घेणं गरजेचं असतं, असं अनेक रिसर्चमधून सिद्ध झाल्याचं आपण पाहतो. पण अनेक लोक असे आहेत जे फार कमी झोपतात. काही लोकांना झोप येतच नाही. पण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाल लवकर झोप येण्यास मदत होईल. जाणून घेऊयात अशा उपायांबाबत....

जर तुम्ही 22 च्या पुढच्या वयोगटातील असाल तर दररोज साडे सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक आहे. लहान मुलं आणि तरूण मुलांनी साडे आठ तास ते अकरा तासांची झोप घेणं गरजेचं असतं. 

रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही कॅफेन असणाऱ्या पदार्थांचे म्हणजेच चहा-कॉफी सेवन करणं टाळावं. जर रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करत असाल तर कॅफेन असणारी उत्पादनं आणि निकोटीन यांपासून दूर रहा. जर तुम्ही कॅफेनयुक्त गोष्टींचं सेवन केलंत, तर त्यांचा प्रभाव शरीरावर तसाच राहतो आणि तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील तुम्हाला झोप लागत नाही. तसेच हे पदार्थ शरीरासाठीही हानिकारक ठरतात.

रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी 2 ते 3 तासांपूर्वीच घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त जेवण जेवताय तर तुम्हाला झोपण्यास त्रास होईल. त्यामुळे झोपण्याच्या काही वेळ आधी जेवण करणं गरजेचं असतं. 

रात्री झोपण्याआधी काही अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, काही पुस्तकं वाचा, गाणी ऐका.

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर लगेचच हातातील कामं बाजूला ठेवून झोपा. जबरदस्ती जागं राहू नका. 

चेरी, दूध, केळी, बदाम, सलाड, हर्बल चहा इत्यादी गोष्टींचे सेवन करणं गरजेचं असतं. यामुळे चांगली झोप घेण्यास मदत होईल. 

रात्री लवकर झोपण्याचे फायदे -

- तणाव कमी होतो. 

- सकाळी ताजंतवानं वाटतं. 

- स्मरणशक्ती सुधारते.

- वजन कमी करण्यास मदत मिळते.

- अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य