आरोग्यासाठी नारळपाणी खूप फायदेशीर ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. डाएटिशियन वाणी अग्रवाल यांनी ओन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला दिलेले हे फायदे जाणून घेतल्यास आपण कधीही नारळाचा उरलेला भाग टाकून देणार नाहीत. वजन कमी करण्यात फायदेशीर सामान्यत: लोकांना असं वाटतं की नारळाची मलाई खाल्ल्यास वजन वाढतं. परंतु असं नाही, जर आपण हे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते शरीरात चरबी साठवण्याऐवजी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. नारळाच्या मलाईमध्ये असणारे पॉवर-पॅक फॅट आपल्याला बर्याच काळासाठी परिपूर्ण ठेवते.उर्जेने भरपूर नारळाच्या मलाईला तुम्ही उर्जेचा पॉवर हाऊस म्हणून शकता. नारळाच्या लगद्यामध्ये असलेली मलाई शरीरात तत्काळ ऊर्जा निर्माण करते.
नारळाची मलई टाकून देण्याचा विचारही करू नका, फायदे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:28 IST