व्यायाम करताय, पण फ्लेक्जिबिलिटीचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:52 PM2017-12-22T17:52:55+5:302017-12-22T17:53:39+5:30

ब्लड सर्क्युलेशन आणि इन्ज्युरीचा धोका टाळण्यासाठी ताणाचे व्यायाम आवश्यक

Doing exercise, but what about flexibility? | व्यायाम करताय, पण फ्लेक्जिबिलिटीचं काय?

व्यायाम करताय, पण फ्लेक्जिबिलिटीचं काय?

ठळक मुद्देव्यायामानंतर फ्लेक्जिबिलिटी एक्सरसाइजेस प्रत्येकानं करायला हवेत.त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढतेच, शिवाय आयुष्यही.आपले मसल्स रिलॅक्स होतात आणि शरीरातील जॉइन्ट्सही फ्लेक्जिबल राहतात. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि इन्ज्युरीचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

- मयूर पठाडे

पुरुष असो किंवा स्त्री, व्यायाम सर्वांनाच अनिवार्य आहे आणि प्रत्येकाला आता त्याचं महत्त्व पुरेसं कळलेलंही आहे. त्यामुळे आजकाल व्यायामासाठी जिमला, जॉगिंग ट्रॅकवर किंवा घरातल्या घरातच काही ना काही व्यायाम करणाºयांची संख्या वाढत चालली आहे.
पूर्वी व्यायामापासून दूर असणाºया स्त्रिया, तरुणीही आता व्यायामासाठी जिममध्ये जाताना दिसतात. पण कोणता व्यायाम करायचा, कोणत्या व्यायामानं काय फायदा होतो, याविषयी महिलांमध्ये अजूनही फारशी जागरुकता दिसत नाही. त्यामुळे इतर जण जे करतात तेच आपणही करायचं किंवा जिममधल्या ट्रेनरलाच ‘मी काय करू?’ असं विचारायचं आणि मग तो जे काही सांगेल तो व्यायाम करायचा.. हेच सूत्र आजकाल बव्हंशी दिसतं.
व्यायाम करताना आपल्या शरीराचे ढोबळमानानं तीन भाग पडतात.
पहिला प्रकार म्हणजे अप्पर बॉडी एक्सरसाइज, दुसरा प्रकार लोअर बॉडी एक्सरसाइज आणि तिसरा प्रकार म्हणजे अ‍ॅबडॉमिनल (पोटाचे) एक्सरसाइज.
त्यासाठी, विशेषत: महिलांनी कोणता व्यायाम करायचा हे तुम्हाला माहीत आहे?
तो माहीत करून घ्या आणि आपल्या जिममधल्या ट्रेनरलाही त्यासंबंधी विचारा.
अप्पर बॉडी एक्सरसाइजेस- ट्रायसेप्स लिफ्ट्स, बायसेप कर्ल्स, चेस्ट आणि शोल्डर लिफ्ट्स, इत्यादि..
लोअर बॉडी एक्सरसाइजेस- स्क्वॅट्स, इनर अ‍ॅण्ड आऊटर थाय लिफ्ट्स, प्लाइज, इत्यादि..
अ‍ॅबडॉमिनल एक्सरसाइजेस- क्रंचेस, ट्विस्ट्स, प्लॅन्क, इत्यादि...
हे सगळे व्यायाम करताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे, या व्यायामानंतर फ्लेक्जिबिलिटी एक्सरसाइजेस प्रत्येकानं आवर्जुन करायला हवेत. त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढतेच, शिवाय आयुष्यही. त्यामुळे आपले मसल्स रिलॅक्स होतात आणि शरीरातील जॉइन्ट्सही फ्लेक्जिबल राहतात. शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्ज्युरीचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

Web Title: Doing exercise, but what about flexibility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.