चार वर्षीय बालकावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:32+5:302016-02-23T00:03:32+5:30
फोटो आहे...

चार वर्षीय बालकावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला
फ टो आहे...जळगाव : शहरात कुत्र्यांचा उच्छाद वाढतच असून सोमवारी पुन्हा सदाशिवनगरात एका चार वर्षीय बालकांवर कुत्र्याने जीवघेणा हल्ला करुन त्याला चार ठिकाणी चावा घेतला. यात हा बालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच एका १२ वर्षीय मुलालाही कुत्र्याने चावा घेतला. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी शहरात कुत्र्यांनी १७ जणांना चावा घेऊन जखमी केले होते. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने सोमवारी पुन्हा कुत्र्यांनी दोन जणांना जखमी केले. यामध्ये सदाशिवनगरातील जिशान भैया पटेल (४) हा बालक अंगणात खेळत असताना एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याच्या खांद्यावर, कानाच्या वर व कानाच्या मागे तसेच डोक्यावर कडाडून चावा घेतला. या वेळी कुत्र्याने तर या बालकाला पूर्णपणे आपल्या कवेत घेतले होते. यात मुलगा कोठे आहे, हे सुद्धा दिसत नव्हते. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन कशीबशी बालकाची सुटका केली व त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्याचावर उपचार सुरू आहे. आईला काही सुचेना...जिशान याला कुत्र्याने पूर्णपणे कवेत घेऊन हल्ला केल्याचे दृष्य पाहून त्याच्या आईला काही वेळ भूरळ आली व काय करावे हे सूचत नव्हते, एवढा जोरदार हल्ला या कुत्र्याने केला होता. मुलगा जखमी...दुसर्या घटनेत प्रथमेश रमेश तायडे (१२) या मुलालाही कुत्र्याने चावा घेतला. त्याच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. कुत्र्यांच्या या वाढत्या हल्ल्याने नागरिक भयभीत असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरीत आहे.