Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 20:01 IST2024-07-10T20:00:53+5:302024-07-10T20:01:27+5:30
डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया...

Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे
पावसाला सुरुवात होताच पुन्हा एकदा डेंग्यूचा धोका वाढला आहे. या आजारावर वेळीत उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया...
का फायदेशीर आहे शेळीचं दूध? -
शेळीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D भरपूर प्रमाणात असते. या दुधात फोलेट बाइंडिंग घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील वाढते. शेळीच्या दुधातील प्रथिने जटिल नसतात, यामुळे ते पचण्यासही सहज असते. या दुधामुळे ब्लड काउंटही वाढतो.
शेळीच्या दुधाचे फायदे -
1. शेळीच्या दुधात सेलेनियम असते, जे इम्यून सिस्टिम मजबूत करून आजारांपासून दूर ठेवते.
2. शेळीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फास्फोरस, पोटॅशियम, आयर्न आणि कॉपर आढळते. जे मेटॅबॉलिझम रेट चांगला राहतो आणि शरीर निरोगी राहते.
3. शेळीच्या दुधात कॅल्शियम आणि अमीनो अॅसिड आढळत असल्याने या दुधामुळे दात आणि हाडेही मजबूत होतात.
4. शेळीच्या दुधात चांगले फॅटी अॅसिड असते, जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. पोटॅशियम अधिक असल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रहते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
5. शेळीच्या दुधात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे सूज आणि पेटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर आहे? -
काही तज्ज्ञांच्या मते डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर असू शकते. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर एखादी व्यक्ती रोज शेळीचे दूध घेत असेल तर तो घेऊ शकतो. मात्र, केवळ डेंग्यू बरा करण्यासाठी शेळीचे दूध घेण्याची आवश्यकता नाही. कारण, डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
(टीप - संबंधित माहिती माध्यमांतील वृत्तांच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे अत्यंत अवश्यक आहे...)