शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे 3 सोपे उपाय, असह्य वेदना होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:29 IST

Kidney Stone: तुम्हालाही किडनी स्टोन असेल तर एक्सपर्टनी ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

Kidney Stone: किडनी स्टोनची समस्या आजकाल भरपूर लोकांना होत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आनुवांशिकता इतरही अनेक कारणांनी किडनी स्टोनची समस्या होते. किडनीमध्ये स्टोन झाल्यावर असह्य अशा वेदना होतात. स्टोनचा आकार लहान असेल तर ठीक, पण जर मोठा असेल तर त्याला सहजपणे काढणंही अवघड असतं. अशात सर्जरी देखील करावी लागते. तुम्हालाही किडनी स्टोन असेल तर एक्सपर्टनी ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

एम्समध्ये काम केलेल्या डीएम न्यूरोलॉजी डॉ. प्रियंका सेहरावत यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी सांगितलं की, 'किडनीमध्ये स्टोन होण्याचं मुख्य कारण लघवीमध्ये कॅल्शिअम आणि ऑक्सलेटचं अधिक प्रमाण असतं. जेव्हा हे दोन्ही तत्व एकत्र येतात, तेव्हा क्रिस्टलच्या रूपात काम करतात. नंतर ते स्टोनचा आकार घेतात. अशात तुम्ही जर तुमच्या लाइफस्टाईलमध्ये 3 बदल केले तर किडनी स्टोनपासून तुमचा बचाव होऊ शकते किंवा आधीच असलेली समस्या दूर होते'.

मीठ कमी खा

डॉक्टर सेहरावत यांनी सांगितलं की, मिठामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. जेव्हा कॅल्शिअम जास्त होतं, तेव्हा ते ऑक्सलेटसोबत मिळून स्टोन तयार करतं. अनेक शोधातून समोर आलं आहे की, दिवसभरात मिठाचं प्रमाण 5 ग्रॅम इतकंच असावं. तरच किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

याशिवाय डॉक्टर सायट्रिक अॅसिड असलेली फळं खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनुसार, सायट्रिक अॅसिड लघवीमध्ये स्टोन तयार न होऊ देणारे तत्व वाढवतं. तसेच आधीच असलेले स्टोन तोडण्यासही मदत करतं.

ऑक्सलेट टाळा

किडनीमध्ये स्टोन होण्यासाठी ऑक्सलेट सगळ्यात जास्त कारणीभूत असतं. त्यामुळे ऑक्सालेट असलेल्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. पालक, बीट, रताळे यात ऑक्सालेट भरपूर असतं. भरपूर पाणी प्यावरील गोष्टींशिवाय किडनीमध्ये स्टोन झाला असेल तर पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टरांनुसार, दिवसभरातून किमान 2.5 लीटर पाणी प्यायला हवं. जेणेकून लघवी पातळ राहील आणि विषारी तत्व बाहेर पडतील. पाणी भरपूर प्याल तर छोटे स्टोन सहजपणे बाहेर पडू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स