सचिन तेंडुलकरला आहारात काय आवडते माहित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 12:52 IST2017-06-02T07:22:31+5:302017-06-02T12:52:31+5:30
नुकतीच सचिनने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फूड हॅबिट्सविषयी माहिती सांगितली आहे. चला जाणून घेऊया त्याला काय आवडते.
.jpg)
सचिन तेंडुलकरला आहारात काय आवडते माहित आहे का?
नुकताच सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ रिलीज झाला. सचिनच्या आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी या बायोपिकला खूपच पसंती दिली. आज आम्ही आपणास सचिनच्या आहाराविषयी माहिती देत आहोत. सचिनला खाण्यामध्ये विशेष काय आवडते, त्याच्या विशेष डिशेश कोणत्या आहेत ते आज आम्ही आपणास सांगणार आहोत.
सचिनला खाण्याची खूपच आवड आहे. विशेष म्हणजे त्याला व्हेजसोबतच नॉनव्हेज खायला खूप आवडते. शिवाय त्याला स्वत: स्वयंपाक करायलादेखील खूप आवडते.
नुकतीच त्याने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फूड हॅबिट्सविषयी माहिती सांगितली आहे. चला जाणून घेऊया त्याला काय आवडते.
* आपल्या कुटुंबासाठी फिश करी आणि प्रॉन मसाला तो मोठ्या आवडीने बनवितो. हे तो त्याच्या आईकडून शिकला आहे.
* सचिनला आंबे खूप आवडतात. त्यात गोड चिजकेक आणि अल्फांसो आंबे त्याला सर्वाधिक आवडतात.
* वांग्याचे भरीतही त्याला खूप आवडतो. आणि स्वत:च्या हाताने बनविले असेल तर खूप आनंदाने खातो.
* वरण-भातमध्ये तूप टाकून तो मोठ्या आवडीने खातो.
* जापानीज फूडचा तर सचिन दिवाना आहे. त्यात सुशी आणि साशिमी खूपच आवडते.
* वडा-पावदेखील तो आवडीने खातो.
Also Read : आपल्या लाडक्या क्रिकेटरांचे अलिशान घर पाहून व्हाल थक्क !