कोणे एकेकाळी हाय हिल्स फक्त पुरुषच वापरत हे माहितीये?
By Admin | Updated: June 24, 2017 13:19 IST2017-06-24T13:19:03+5:302017-06-24T13:19:03+5:30
हाय हिल्स ही आजच्या काळात पुरुषांची मक्तेदारी असली तरी पूर्वी ते तसं नव्हतं..

कोणे एकेकाळी हाय हिल्स फक्त पुरुषच वापरत हे माहितीये?
नितांत महाजन
हाय हिल्स घालणं, त्यातलं स्टाइल स्टेटमेण्ट. त्यानं चांगलं दिसणारं पोश्चर, दुखणाऱ्या टाचा, मिळणारा रुबाब, किंवा कंबरदुखी, हिल्स घातल्यानं कोण कसं स्टायलिश दिसतं, हिल्स आऊट आॅफ फॅशन, हिल्स इज फॅशनेबल अशी कितीतरी उलटसुलट चर्चा आपण वाचतो, ऐकतो. पेन्सिल हिल्स, पॉईण्टर हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स असे अनेक प्रकार तरीही मुली वापरतातच. पण हा सारा विषय मुलींपुरताच असतो. मुलींच्या फॅशन्सभोवतीच फिरतो. पण कुणी आपल्याला येवून असं सांगितलं की हिल्सचा जन्म सुरुवातीला पुरुषांच्या पायतणांसाठीच झाला तर आपण विश्वास ठेवू का? पण हे खरं आहे, अलिकडेच कॅनडातल्या टोराण्टो शहरातल्या म्युझिअममध्ये भरलेल्या एका प्रदर्शनात ही माहिती समोर आली.
या म्युझिअममध्ये पुुरुषांच्या चपलांचं, बुटांचं एक प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनात १६व्या शतकांपासून परिधान केली जाणारी पायताणं ठेवण्यात आली होती. पर्शियन संस्कृतीत विशेषत: युरोपात बुटांना चांगली ग्रीप मिळावी म्हणून सुरुवातीला हिल्स ठेवण्यात येवू लागले. अनेक काळ घोडेस्वार पुरुष असे जोडे घालत. १८३० च्या सुमारात महिलांमधल्या सुधारणा चळवळींमुळे महिला विविध क्षेत्रात दाखल होवू लागल्या. त्यामुळे त्यांनीही अशा प्रकारच्या चपला, बूट स्वीकारले. मधल्या काळात ही फॅशन थोडी लूप्तही झाली. पण १९ व्या शतकात मात्र हिल्स पुन्हा परतले. आणि मग त्यानंतर कायम फक्त महिलांसाठीच हिल्स बनू लागले. आता हिल्स ही फक्त बायकांसाठीची गोष्ट झाली आहे. पण काय सांगावं, फॅशन हे एक चक्र असतं,भविष्यात पुरुषांचे हिल्सही परतून येवूच शकतात.