उचकी थांबविण्यासाठी हे करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:47 IST2016-12-22T16:41:50+5:302016-12-22T16:47:58+5:30

आपली कोणीतरी आठवण केली म्हणून उचकी लागली असे बहुतांश लोकांचा समज आहे, मात्र वैद्यक शास्त्रानुसार उचकी येण्याचे शास्त्रीय कारण वेगळेच आहे.

Do this to stop the hiccup! | उचकी थांबविण्यासाठी हे करा !

उचकी थांबविण्यासाठी हे करा !

ली कोणीतरी आठवण केली म्हणून उचकी लागली असे बहुतांश लोकांचा समज आहे, मात्र वैद्यक शास्त्रानुसार उचकी येण्याचे शास्त्रीय कारण वेगळेच आहे. 

का लागते उचकी
आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्वासपटल असते. नैसर्गिक श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे आकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि ‘हिक्’ असा आवाज येतो. या क्रियेला उचकी लागणे म्हणतात. शिवाय खोलीचे तापमान बदलल्यास, गरम खाल्ल्यानंतर, शीतपेय पिल्यास आणि धूम्रपान केल्याने उचकी येते. काही लोकांना चिंतेत असल्यास किंवा खुश असल्यावरही उचकी लागते. 


उचकी थांबविण्यासाठी कराल?
उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने उचकी थांबते अशी जुनी समजूत आहे.
उचकी लागल्यास जीभेखाली मध ठेवा.
बर्फ  किंवा तत्सम थंड पदार्थ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.
मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवल्यास उचकी लगेच बंद होईल. 
आणखी एक उपाय म्हणजे पेपर बॅग किंवा कापड तोंडाशी घेऊन श्वास घ्या आणि सोडा. यामुळे रक्तातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढून तुमची उचकी थांबेल. 

Web Title: Do this to stop the hiccup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.