शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फणस खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय घ्यावी काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:07 IST

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक फणसाची भाजी किंवा गोड फणस खातात. याचे अनेक फायदे होत असतील तरी याचे काही नुकसानही असतात.

फणस खाणं हे अनेकांना आवडतं. लोक वेगवेगळ्या पद्धतीन फणस खातात. फणसाचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण ते जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. फणस चवीला तर चांगला असतोच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. सोबतच हेही जाणून घेणार आहोत की, फणस खाल्ल्यानंतर काय खाऊ नये. 

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक फणसाची भाजी किंवा गोड फणस खातात. याचे अनेक फायदे होत असतील तरी याचे काही नुकसानही असतात. जे सगळ्यांना माहीत असले पाहिजेत. तसेच फणस खाल्ल्यावर आपण काय खाऊ नये हेही माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, फणसामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम भरपूर असतं. ज्यामुळे पचन चांगलं होतं आणि हाडंही मजबूत राहतात. असं असलं तरी फणस खाल्ल्यानंतर पुरण पोळी आणि खायचं पान खावं नाही. असं केलं तर हार्ट अटॅकसारखी समस्या होऊ शकते. 

फणसाचे फायदे

- थायरॉईडपासून आराम

फळांमधून शरीराला मिनरल्सचा पुरवठा होतो. फणसामध्ये कॉपर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवला जातो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

- रोगप्रतिकारशक्ती सुधारते

व्हिटॅमिन सी युक्त फळांच्या सेवनामुळे नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन सीच्या सोबतच साखरही मुबलक असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

- रक्तदाब नियंत्रणात राहतो

दिवसभरातील शरीराला आवश्यक पोटॅशियमच्या गरजेपैकी १४% गरज केवळ वाटीभर फणसाच्या गरामधून पूर्ण होते. पोटॅशिअमयुक्त हे फळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. 

- पचन सुधारते

फणसामध्ये डाएटरी फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदानुसार, कच्चा  फणस पचनक्रियेचा त्रास असणार्‍यांसाठी पचायला कठीण, त्रासदायक ठरू शकतो.

- कॅन्सरचा धोका कमी होतो 

फणसामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. फणसाचा गर चिकट आणि स्टार्ची असल्याने आतड्यांमधील घातक घटक बाहेर काढण्यास, पचनक्रिया सुधाण्यास मदत करतात. 

- एनिमिया

फणसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांचं प्रमाण अधिक असतं. सोबतच फॉलिक अ‍ॅसिड, नायसिन, व्हिटॅमिन बी ६ सुध्दा अधिक प्रमाणात आढळतात. तसेच लाल रक्तपेशींना चालना देणारे मॅग्नीज, मॅग्नेशियम, कॉपर घटक यात असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

- हाडं मजबूत होतात

हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतं. फणसाच्या मूठभर गरामधून शरीराला ५६.१ मिलीग्रॅम कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास असणार्‍यांना फणसातून कॅल्शियम मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य