शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चहासोबत ब्रेड खाण्याचे धोके समजून घ्याच अन्यथा, दुष्परिणामांना आयते आमंत्रण द्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:24 IST

चहासोबत ब्रेड खाल्ल्याने आरोग्याला नक्की काय आणि कसं नुकसान होऊ शकतं? जाणून घेऊ या.

आपल्या देशात चहाप्रेमींची कमी नाही. अनेकांना तर काहीही झालं तरी वेळेवर चहा मात्र लागतोच. तसेच असे काही लोक आहेत, ज्यांचा चहा जरी चुकला तरी देखील त्यांचा दिवस चांगला जात नाही. अनेक लोक तर आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण चहा पिणाऱ्यांमध्ये दोन प्रकार आहेत. काहींना चहा फक्त पिण्यासाठी आवडतो, तर काही लोकांना चहासोबत काही तरी खाण्यासाठी आवडतं.

अनेक लोकांना अशी सवय असते की, ते चहासोबत ब्रेड, फरसाण आणि बिस्किटे खातात. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं? अनेक लोक याला चांगला नाश्ता समजतात. कारण तो झटपट बनतो आणि त्याने पोट देखील भरलेलं राहातं. परंतू चहासोबत ब्रेड खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांनी तुम्ही घेरले जाऊ शकतात, हे विसरु नका. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने आरोग्याला नक्की काय आणि कसं नुकसान होऊ शकतं? जाणून घेऊ या.

वजन वाढणेब्रेड हे मैद्याच्या पिठापासून बनवल्या जातात. शिवाय, त्यात घातक रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्यांना पचवणे कठीण जाते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या तर वाढतातच, पण यामुळे वजन देखील वाढते. त्यामुळे जर तुम्हालाही चहासोबत ब्रेड खाण्याची आवड असेल तर आजच तुमची सवय बदला.

रक्तातील साखर वाढतेचहा आणि ब्रेडचे सेवन मधुमेहींसाठी खूप हानिकारक आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. ज्यामुळे अशा लोकांनी चहासोबत ब्रेडचे सेवन कधीही करु नये.

उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी समस्याउच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये बीपीची पातळी वाढू शकते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांना चुकूनही चहासोबत ब्रेड खाऊ नये.

पोटात अल्सर होऊ शकतोजर तुम्ही सकाळी ब्रेडसोबत चहाचे सेवन केले, तर त्यामुळे पोटाचा अल्सर होऊ शकतो, कारण चहाचे सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स