शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेत पसरतोय 'डिंगा डिंगा', या आजारामुळे रुग्ण नाचू लागतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:55 IST

Dinga Dinga : सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच नाचण्याचा आजार असे नाव दिले आहे.

Dinga Dinga :  आफ्रिकेतील युगांडामध्ये जवळपास ३०० लोक एका गूढ आजाराचे बळी ठरले आहेत. या आजाराला 'डिंगा डिंगा' असे नाव देण्यात आले आहे. IANS च्या रिपोर्टनुसार, हा आजार प्रामुख्याने महिला आणि मुलींमध्ये दिसून येत आहे. या आजारामुळे खूप ताप येतो आणि शरीरही सतत थरथरत असते. शरीर जास्त थरथरत असल्यामुळे या आजाराचा रुग्ण सतत हालत राहतो, म्हणून सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच नाचण्याचा आजार असे नाव दिले आहे.

आफ्रिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर यांनी सांगितले की, या आजारावर सध्या अँटिबायोटिक औषधांनी उपचार केले जात आहेत. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच, हा आजार कसा आला आणि तो का पसरत आहे, याची अचूक माहिती अद्याप आरोग्य विभागाला मिळालेली नाही. दरम्यान, सध्या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये (DRC)  डिंगा डिंगा रोगाचे रुग्ण सामान्यतः बरे होत आहेत. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO) येथे ३९४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आफ्रिकेचे आरोग्य विभाग डिंगा डिंगा या आजाराच्या प्रादुर्भावाचे कारण शोधत आहे. इन्फ्लूएन्झा, कोविड-१९, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराचे कारण आहेत का, याचा शोध घेतला जात आहे, मात्र सध्या डिंगा डिंगा या आजाराच्या प्रादुर्भावाची कारणे समजू शकलेली नाहीत. ज्या भागात हा आजार पसरत आहे, तेथे लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हा आजार सांसर्गिक मानला जातो आणि त्याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त केली जाते.

एक्स रोगाची प्रकरणेगेल्या तीन महिन्यांत आफ्रिकेत अनेक आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्सनंतर एक्स रोगाचे रुग्णही आढळत आहेत आणि त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आता तर डिंगा डिंगा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने धोका आणखी वाढला आहे. लोकांनाही या आजाराबाबत सतर्क केले जात आहे.

डिंगा डिंगा आजाराची लक्षणं- ताप येणे- डोकेदुखी- खोकला- सर्दी आणि अंगदुखी 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInternationalआंतरराष्ट्रीय