शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही पॅकेटचं दूध पुन्हा पुन्हा गरम करता? एक्सपर्टने सांगितले होणारे गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:15 IST

पॅकेटचं दूध वापरत असताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे पॅकेटचं दूध उकडून पिणे.

दूध एक संपूर्ण आहार म्हणून ओळखलं जातं. दुधाने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात अनेक पोषक तत्व असतात ज्यांची शरीराला गरज असते. दुधात कॅल्शियम, प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, पोटॅशिअम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन A, मॅग्नेशिअम आणि रायबोफ्लेविन इत्यादी तत्व असतात. दुधामुळे हाडं मजबूत होतात आणि मसल्सची वाढही होते. तसेच दुधाने शरीराला एनर्जी मिळते.गाव-खेड्यांमध्ये गायी-म्हशीचं ताजं दूध सहजपणे मिळतं. पण शहरांमध्ये जास्तीत जास्त पॅकेटच्या दुधाचा वापर केला जातो. मात्र, पॅकेटचं दूध वापरत असताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे पॅकेटचं दूध उकडून पिणे.

डायटीशिअन भावेश गुप्ता यांनी सांगितलं की, पॅकेटचं दूध गरम करून सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं केल्याने दुधातील पोषक तत्व नष्ट होतात. अशात पॅकेटचं दूध गरम करून प्यायल्याने काय नुकसान होतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

पॅकेटचं दूध गरम करण्याची नाही गरज

डायटीशिअनने सांगितलं की, पॅकेटचं दूध आधीच पाश्चराइज्ड असतं. पाश्चरायजेशन प्रक्रियेत कच्च्या दुधाला ७२ डिग्री सेल्सिअसवर १५ ते ३० सेकंदापर्यंत गरम केलं जातं. ज्यामुळे त्यातील बॅक्टेरिया जसे की, सेलमोनेला आणि ई-कोली नष्ट होतात. या प्रक्रियेनंतर पॅकेटचं दूध सुरक्षित होतं आणि याला पुन्हा पुन्हा गरम करण्याची गरज नसते.

दुधात व्हिटॅमिन बी१२ असतं. हे एक असं पोषक तत्व आहे जे संपूर्ण शरीराला शक्ती देण्याचं काम करतं. हे जर कमी झालं तर हाडं कमजोर होतात. रक्त कमी होऊ शकतं, मसल्स कमजोर होतात. तसेच मेंदुही कमजोर होऊ शकतो. डायटीशिअन म्हणाले की, पॅकेटचं दूध गरम केल्याने हे पोषक तत्व नष्ट होतं.

दूध पुन्हा पुन्हा गरम का करू नये?

एक्सपर्ट सांगतात की, कच्च्या दुधात क्रिप्टो स्पोरिडिअम, कॅम्पिलोबॅक्टर, ब्रुसेला आणि लिस्टेरियासारखे नुकसानकारक बॅक्टेरिया असतात. पाश्चरायजेशनच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया नष्ट केले जातात, ज्यामुळे दूध सुरक्षित होतं. मात्र, दूध पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.

पॅकेटचं दूध कधी गरम करावं?

डायटीशिअनने सांगितलं की, पॅकेटचं दूध तेव्हाच गरम करावं जेव्हा त्यापासून तुम्हाला दुसरे काही पदार्थ बनवायचे असतील. जसे की, पनीर. जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर गरम करण्याची गरज नाही, थोडं कोमट नक्कीच करू शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य