शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फास्ट फूडला पर्याय डाएटयुक्त पदार्थांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 12:44 AM

चांगला आणि परिपूर्ण आहार घ्यायचा असेल, तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यावश्यक असते.

- स्वाती पारधीचांगला आणि परिपूर्ण आहार घ्यायचा असेल, तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यावश्यक असते. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जगात चांगला आणि संतुलित आहार घ्यायचा असेल, तर त्यासाठी अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. परंतु, आहाराबाबतीत कायम काहीतरी नावीन्य शोधणाऱ्यांसाठी संतुलित आहार घेणे फारसे कठीण नसेल. आज घड्याळाच्या काट्यावर चालणाºया आपल्या जीवनात फास्ट फूडचा सर्रास वापर केला जातो. घरच्या जेवणाला एक पर्याय म्हणूनही आपण फास्ट फूड स्वीकारलेले आहे. परंतु, संतुलित आहाराची तुलना फास्ट फूडशी करताना प्रथम चांगल्या प्रकारच्या डाएट फूडची यादी केली पाहिजे. दैनंदिन आहारातील नियोजनात फास्ट फूडमधील गोष्टींचा समावेश करण्यापेक्षा गुणवत्तावादी डाएट फूडचा समावेश निश्चितच करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय खाण्याच्या पद्धतीनुसार सकाळचा नाश्ता, जेवण, संध्याकाळचा (मधला नाश्ता) आणि रात्रीचे जेवण अशा पद्धतीचे असते. त्यात आॅफिसच्या धावपळीत सकाळच्या नाश्त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बाहेरचे पदार्थ अर्थातच फास्ट फूड हा पर्याय ठरतो.१. दुपारच्या जेवणात चपाती, भाजी आणि शक्य असल्यास सॅलड असे प्रकार असतात. मात्र, लहानलहान गोष्टी आणि त्याचे तितके डबे स्वत:बरोबर घेऊन बाहेर पडणे, हे जिकिरीचे असते. म्हणून चपाती, भाजी हाच पर्याय आपणास उत्तम वाटतो.२. संध्याकाळचा नाश्ता यातही पुन्हा फास्ट फूड, जंक फूड किंवा फ्रूट ज्युस असेच प्रकार खाण्यात येतात.३. मुख्यत: दिवसभर घराबाहेर असल्याकारणाने रात्रीचे जेवण हे परिपूर्ण जेवण असावे, अशी इच्छा असते. पण, याच इच्छेखातर आपण खूप मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी इंटेक्ट करू, याची कल्पना आपण करू शकतो.४. रात्री जेवणानंतर आइस्क्रीम किंवा चॉकलेट्स किंवा स्वीट डिशेस खाण्याची अनेकांना सवय असते, हे एक फॅडच बनले आहे. त्यामुळे कळत-नकळत आपण आपल्या संतुलित आहाराचे आणि पर्यायाने शरीराचे संतुलन बिघडवत चाललो आहोत. त्याचे गंभीर परिणामसुद्धा दिसून येतात.५) भाज्यांचा समावेश करताना बटाट्यासारख्या पदार्थांचा वापर कमी करावा.६) अन्नपदार्थांचे नियोजन करताना एका पदार्थातून एकचतुर्थांश इतके प्रोटीन मिळेल, हे पाहावे.७) वेगवेगळ्या रंगाची फळे आणि भाज्यांचा समावेश गुणवत्ता आणि आकर्षकता वाढवण्यासाठी करता येऊ शकतो.८) मैदायुक्त पीठ आणि तत्सम पदार्थांपेक्षा व्हिटचा वापर करण्यात यावा.९) डाएटयुक्त फास्ट फूडचे पूर्वनियोजन केल्याने कोणत्याही प्रकारचा पदार्थ बनवण्यास विलंब लागत नाही.१०) पिष्ठमय पदार्थांचा अवाजवी वापर करण्यापेक्षा ताज्या भाज्या किंवा सॅलड इ.चा वापर करावा.११) कोणत्याही पदार्थांच्या शेल्फ लाइफचा अभ्यास करून ते-ते पदार्थ आपल्या सोयीप्रमाणे फ्रीजमध्ये साठवणूक करून ठेवावे आणि योग्यवेळी वापरावे.१२) अतिशिळे, खराब किंवा सतत गरम केलेले पदार्थ खाण्यात आणू नये.>गुणवत्तापूर्ण पदार्थांची यादीपाणी, शर्करेचे प्रमाण कमी असणारा चहा, कॉफी, शीतपेयांपेक्षा कमी गोड पेय यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. होल ग्रेन्स सारख्या अन्नधान्याचा फास्ट फूडमध्ये समावेश करून घ्यावा. अन्नपदार्थात किंवा जेवणात चिकन, मासे तसेच दुग्धजन्य चीज,बटर,घी, सर्व प्रकारच्या डाळी इ. पदार्थाचा समावेश करावा. फास्ट फूडमध्ये समावेश होणाºया भाज्य किंवा रिफाईंड आॅइल याऐवजी आॅलिव्ह आॅइल किंवा तूप, खोबरेल तेल याचा वापर करावा.>आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला परिपूर्ण आहार आणि योग्यवेळेत घेणे शक्य होतेच असे नाही. परिणामी, आपण अनेकदा फास्ट फूडचे सेवन करतो. मात्र, वाढते वजन, आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दुसरीकडे डाएटही सुरू असते. अशावेळी फास्टफूड टाळण्याचा सल्ला दिला जातो. परंतु फास्ट फूडने भागणारी भूक गुणवत्तापूर्ण डाएट पदार्थही भागवू शकतात. त्यामुळे आता डाएट करताना चिंता करण्याचे कारण नाही.