शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आजारांपासून करायचा असेल स्वत:चा बचाव तर रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:35 IST

रात्रीच्या जेवणाच्या वेळी अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करतात, ज्यामुळे ते आजारी देखील पडतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याविषयी माहिती जाणून घेऊया.

आहाराचा आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. 'सकाळची न्याहारी राजासारखी, दुपारचे जेवण राणीसारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे' अशी अन्न खाण्याबाबत एक म्हण आहे. यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते. पण, बरेच लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळी अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करतात, ज्यामुळे ते आजारी देखील पडतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याविषयी हर जिंदगीमध्ये दिलेली माहिती जाणून घेऊया.

रिफाइंड पीठ खाऊ नका -रात्रीच्या वेळी रिफाइंड पिठाचा समावेश आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. रिफाइंड पीठ खाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. रिफाइंड केलेले पीठ लवकर पचत नाही. रिफाइंड केलेले पीठ जास्त खात असाल तर ते टाळावे. रिफाइंड पीठ हे एक प्रकारचा मैदाच असतो.

दही नको -दह्याचा वापर हिवाळ्यात कमी पण उन्हाळ्यात जास्त होतो. अनेकजण रात्रीच्या जेवणात दह्याशिवाय जेवत नाहीत. पण, आयुर्वेदात रात्रीच्या जेवणात दही खाऊ नये, असे सांगितले आहे. रात्री दही खाल्ल्याने कफ वाढण्याची भीती असते. रात्री जास्त दही खात असाल तर सुरुवातीला प्रमाण कमी करा नंतर बंद केलेले फायदेशीर ठरेल. हृदय विकाराच्या रुग्णांनी खाणे टाळावे.

चॉकलेट खाणे टाळा -भारतीय लोकांना जेवणानंतर गोड पदार्थ खायला आवडतात. अन्न खाल्ल्यानंतर काही गोड मिळाले नाही तर अनेकजण चॉकलेट खायला लागतात. रात्रीच्या जेवणानंतर गोड चॉकलेट खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मते, जेवणानंतर चॉकलेट खाणे म्हणजे रोगांना मेजवानी देण्यासारखे आहे. ते पचायलाही वेळ लागतो.

रात्रीच्या जेवणातही हे पदार्थ घेऊ नका -रिफाइंड पीठ, दही आणि चॉकलेट खाण्याव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रात्रीच्या जेवणात टाळल्या पाहिजेत. आयुर्वेदानुसार कच्ची कोशिंबीर, जास्त मिठाई आणि पीठाचे पदार्थ टाळावेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स