शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं घातक, वेळीच सावध झाला तर बरं होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:00 IST

Diabetes Tips: WHO नुसार, भारतात साधारण 7.7 लोक टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण आहेत. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे. तेच साधारण 2.5 कोटी लोक  प्री-डायबिटिक आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना डायबिटीसच्या परिणामांबाबत माहीत नाही. 

Diabetes Tips: हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण थंडी दूर करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी गरम पाणी मदत करतं. पण डायबिटीस असताना गरम पाण्याने आंघोळ करणं सुरक्षित आहे? किंवा ही गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय शुगरच्या आजारात धोकादायक ठरू शकते?

WHO नुसार, भारतात साधारण 7.7 लोक टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण आहेत. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे. तेच साधारण 2.5 कोटी लोक  प्री-डायबिटिक आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना डायबिटीसच्या परिणामांबाबत माहीत नाही. 

जर टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण गरम पाण्याने आंघोळ करत असतील तर त्यांना काही फायदे मिळू शकतात. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर HbA1c लेव्हल कमी होऊ शकते. HbA1c टेस्टने गेल्या 2 ते 3 महिन्याच्या सरासरी ब्लड शुगर लेव्हरची माहिती घेता येते. ही माहिती Scimex नुसार, EASD च्या वार्षिक बैठकीत देण्यात आली होती.

पण जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं डायबिटीक रूग्णाच्या पायांसाठी फार घातक ठरू शकतं. NIDDK ने सांगितलं की, गरम पाण्याने पाय धुणे किंवा त्यात पाय भिजवल्याने त्वचा कोरडी होते. ज्यामुळे घाव, त्वचेला इजा किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. या सवयीने त्वचेची संवेदनशीलताही नष्ट होऊ शकते.

जर तुम्ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन घेता. तर गरम पाण्याने आंघोळ करताना काळजी घ्या. कारण सीडीसीने सांगितलं की, गरम पाणी रक्तनलिकांना रिलॅक्स करतं. ज्यामुळे इन्सुलिन वेगाने अवशोषित होतं. अशात इंजेक्शनसोबत जास्त गरम पाणी इन्सुलिन बिघडवून शुगल लेव्हल फार जास्त कमी करू शकतं.

डायबिटीसच्या रूग्णांनी त्वचेची फार जास्त काळजी घ्यायला हवी. कारण गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यांना खूप समस्या होऊ शकतात. ज्या खालील प्रमाणे आहेत.

स्कीन इन्फेक्शन

खाज किंवा रॅशेज

त्वचा कोरडी होणे

त्वचेवर सूज

जखमा लवकर न भरणे

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. तुम्ही आंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. तेच आंघोळ करण्याआधी त्वचेवर मॉश्चरायजर लावा आणि आंघोळ केल्यावर पायांच्या बोटांच्या मधे पावडर लावा. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स