शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Diabetes Symptoms: डायबिटीस आहे का हे कधी चेक करायचं?... 'ही' आहेत मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 18:01 IST

Diabetes Symptoms : डायबिटीस रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे.

- डॉ. नितीन पाटणकर (एम. डी., विस्डम क्लिनिक)

मुंबई :  मधुमेह म्हणजेच डायबिटीस... याला शहरी जीवनाची आपत्तीसुद्धा म्हटले जाते. डायबिटीस रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की, त्याच्या रुग्णांची संख्या ५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. धकाधकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार ही डायबिटीसची कारणं आहेत. या आजाराच्या रुग्णांनी आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर त्यांच्या समस्या वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

आपल्याला डायबेटिस आहे का, हे चाचणी केल्यावरच कळतं. पण, ही चाचणी नेमकी कधी करायची, काय लक्षणं दिसल्यावर लॅबमध्ये जायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं खालीलप्रमाणेः

>> काल रात्री भरपूर जेवण झालं.  जेवण अगदी अंगावर आलं. गुंगी आली. झोप लागली पण नेहमीप्रमाणे शांत झोप नाही. सारखी स्वप्नं पडत होती. सकाळी उठल्यानंतर डोकं जड. जणू काही हॅंगओव्हर असावा. असं होत असल्यास डायबिटीस नाही ना, ते चेक करून घेणे इष्ट. 

>> रात्री झोपताना तळपायांना कंड सुटणे. किती खाजवलं तरी कंड न शमणे. हे त्वचेच्या कोरडेपणामुळे घडते. त्याला मॅाइश्चरायजर लावल्याशिवाय जात नाही. असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करावं. 

>> रात्री झोपेत पायाला मुंग्या येऊन जाग येणे, सकाळी उठताना हातापायाला मुंग्या जाणवणे, सकाळी जागे होताना हातात ताकद नसल्यागत वाटणे, हातापायांची आग होणे, असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करून घ्या. 

>> रात्री झोपेत लघवीला लागल्याची स्वप्नं पडणे, त्या स्वप्नात लघवी करताना ती प्रत्यक्षात होऊन जाग येणे, रात्री लघवीसाठी अनेकदा झोपेतून उठावे लागणे, लघवीला वरचेवर जळजळ होणे, असं होत असल्यास डायबेटीस नाही ना ते तपासून पाहा.

>> डोळ्यांचा नंबर अचानक बदलला किंवा काही महिन्यातच नवीन काढलेला नंबर पुन्हा बदलला असं होत असल्यास डायबिटीस नाही ना हे एकदा तपासून घ्या. 

>> कारण नसताना, प्रयत्न न करताच वजन कमी होणे, पाळीचे त्रास, मानेभोवती काळा पट्टा तयार होणे, खूप भूक लागणे, जेवण झाल्यानंतर दोन तासात एकदम हातपाय थरथरणे, घाम फुटणे, साखर खावीशी वाटणे असं होत असल्यास डायबिटीसची चाचणी करून घेणे योग्य. 

>> सतत थकवा येणे, उदासीन वाटणे, भिरभिरते विचार डोक्यात राहणे, कामात फोकस नसणे, लैंगिक सुख उपभोगण्यात अडचणी येणे असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करून घेणे. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स