शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाईट शिफ्ट म्हणजे मधुमेहाचा धोका, संशोधनातून धक्कादायक खुलास; वाचा यावरील उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 17:36 IST

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने दिवसा अन्न खाल्ले तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही, ज्यामुळे त्याच्यामध्ये मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

तुम्ही नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी रात्री जेवण केले नाही तर त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका कमी होतो. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने दिवसा अन्न खाल्ले तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही, ज्यामुळे त्याच्यामध्ये मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे संशोधन सायन्स  अ‍ॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालं (Diabetes prevent from only daytime eating) आहे.

रात्रपाळीत काम करणाऱ्यांना मधुमेहाचा धोकासंशोधनाच्या लेखकाने सांगितले की, या अभ्यासाचा उद्देश रात्री काम करणाऱ्या लोकांचे जीवन सुलभ बनवणे हा आहे. ते म्हणाले की, दुकाने, हॉटेल्स, ट्रक चालक, अग्निशमन कर्मचारी आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका जास्त असतो. कारण, हे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात आणि रात्री त्यांना खावेही लागते. रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

नॅशनल सेंटर फॉर स्लीप डिसऑर्डर रिसर्चच्या मारिस्का ब्राउन यांनी सांगितले की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक गुंतागुंती होतात. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रात्रपाळीच्या कामाचा परिणाम थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना दोन गटात विभागण्यात आले. दोन्ही गट रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायचे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या एका गटाला दिवसा जेवण दिले जात होते आणि रात्री जेवण दिले जात नव्हते. तर इतर गटातील लोकांना रात्री आणि दिवसा दोन्ही वेळी जेवण दिले जात होते.

धक्कादायक निष्कर्ष१४ दिवसांनंतर निकालाचे विश्लेषण केले असता आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले. अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक दिवसा अन्न खातात आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना रात्री जेवतात त्यांच्यामध्ये ग्लुकोजच्या पातळीत 6.4 पट वाढ झाली होती, तर फक्त दिवसा जेवलेल्या व्यक्तींमध्ये ग्लुकोजची पातळी सामान्य राहिली. मारिस्का यांनी सांगितले की, हे संशोधन अगदी कमी प्रमाणात केले गेले असले तरी त्याचे परिणाम अगदी स्पष्ट आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स