शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटिस आणि आंबा... ओ भाऊ, थोडं थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 14:53 IST

ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘ज्याला जे हवे ते मिळो’ असं म्हटलंय. त्यांनी खरे तर, ‘ज्याला जे हवे ते मिळते’, असे म्हणायला हवे होते. पुण्यात लक्ष्मीरोडवरून चालत जाताना बघा. स्त्रीपुरुष जोडीने चालताना दिसले तर नीट बघा.

- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)

ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘ज्याला जे हवे ते मिळो’ असं म्हटलंय. त्यांनी खरे तर, ‘ज्याला जे हवे ते मिळते’, असे म्हणायला हवे होते. पुण्यात लक्ष्मीरोडवरून चालत जाताना बघा. स्त्रीपुरुष जोडीने चालताना दिसले तर नीट बघा. त्यातील एक जण आजुबाजूच्या दुकानातील साड्या दाखवीत असतो आणि दुसरा म्हणत असतो, ‘मला काही दिसायला नको, मला काही ऐकू यायला नको’. हे त्या जोडीतील एकजण मागतो आणि त्याला ते मिळतेच. इथपर्यंत वाचत आला असाल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की, मी इथे स्त्रीपुरुष असा भेदभाव केलेला नाही. असे अनेक अनुभव अनेकांना आले असतील. 

मेडिकल रिसर्च हा असाच ‘ जो जे वांछील तो ते लाहो’ या पद्धतीने बघितला जातो. मागे केव्हातरी, दारू पिण्याने रक्ताभिसरण सुधारते असे दिसून आले. या शोधनिबंधात कुठेही दारूमुळे लिव्हर खराब होत नाही असे म्हटलेले नव्हते. पण सर्व ‘पियकर आणि पेयसींनी’ या शोधाचा उपयोग ‘लायसेन्स टू ड्रिंक’ असाच केला. पूर्वी मुतखडा झाला की ‘बियर हे औषध’ आहे असे सांगून बियर पीत. तसेच पुढे ‘मला हार्ट ट्रबल आहे म्हणून’ मला दारू प्यावी लागते असे सांगणारे विद्वानही पण आपण बघितले असतील. कुठचीही गोष्ट ही पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते. ज्या गोष्टी माणसाला खूप आवडतात त्यात व्यसन लागण्याचे गुण असतात तसेच त्यात बऱ्यावाईट गोष्टीही असतात. लोकाच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही असं म्हणतात. तसेच आपल्या आवडत्या पदार्थातील गुण दिसतात दोष दिसत नाहीत. हे आठवण्याचे कारण म्हणजे आता आंब्याचा सीझन चालू होतोय. आंब्यामधील कुठच्यातरी द्रव्यामुळे डायबेटीस कमी होतो वगैरे संशोधने वाचून गोंधळ उडालेला आहे. पण, पूर्वी आंब्यातून जितकी साखर आणि कॅलरी मिळायच्या तेवढ्याच आत्ताही मिळतात. एखादे केमिकल आणि छोटासा शोधनिबंध यावर विसंबून लोक सल्ला देतात, “खा लेको आंबे, काही होत नाही त्रास, झाला तर फायदाच होतो”. लोकांना काय, ‘मला आवडतात त्या गोष्टी खा’  म्हणून सांगणारा सल्ला आवडतो. मग काय सीझनला आंब्यावर आडवा हात मारला जातो. पुढे तुमच्या डायबेटीसचे काय व्हायचे ते होवो. 

सत्य बोला, प्रिय बोला पण अप्रिय सत्य बोलू नका अशा अर्थाची म्हण आहे. हल्ली ती म्हण वेगळ्या रितीने वापरतात. 

सत्य वा असत्य बोला, पण प्रिय बोला. कलिंगड, उसाचा रस, आंबा इत्यादी खाण्याची वांछना असेल तर तसेच सल्ले दिसत राहतील. तेव्हा चला पसायदान म्हणूया, ‘जो जे वांछील तो ते लाहो’.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स