शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळी 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज; चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:32 IST

संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठळक मुद्देसंस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो.

ठाणे : म्युस फाउंडेशन या युवा संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत 'मासिका महोत्सव' या संकल्पनेत स्त्रिया आणि तृतीयपंथीयांना जगावर ओढवलेल्या महामारीचा मासिक पाळी हाताळण्यावर झालेला परिणाम यावर एका चर्चासत्रात स्वाती सिंग-मुहीम, अंजली दालमिया, पॅट्रीशिया एम्बोया, स्टीफन एनझुसा आणि डियान डी मेनेझेस यांनी आपले विचार मांडले.शहरात आणि गावात स्थायिक असलेल्यांना महामारीमुळे आर्थिक चणचण जाणवली ज्याचा परिणाम त्यांच्या पौष्टिकतेवर झाला. आर्थिक बंधनामुळे सॅनिटरी पॅड्स आणि इतर संबंधीत गोष्टींना महत्व दिले गेले नाही. मासिक पाळी अनुभवणाऱ्यांना शहरातून गावाला येताना पुरेशा पायाभूत सुविधा आणि शौचालय न मिळाल्याने  शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. महामारी पसरल्यावर सॅनिटरी पॅड्स आणि मासिक पाळी संबंधी गोष्टींचा पुरवठा न झाल्यामुळे तरुण मुलींना व स्त्रियांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. केनियातील मासिक पाळी प्रश्न  हाताळणाऱ्या समितीने काही प्रकरणे हाताळली ज्यात तरुण मुलींना मासिक पाळीसाठी लागणारे पॅड्स परवडत नाही म्हणून त्यांनी गर्भवती राहण्याचा निर्णयही घेतला. अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा यांनाही महामारीमुळे बळ आले.स्त्रीरोगतज्ञ आणि इतर वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आणि महामारीच्या काळात मासिक पाळीकडे दुर्लक्षिले गेले.या चोघांनीही आपल्या शहरांमधल्या व्यथा सांगत योग्य ते उपाय सुद्धा सुचवले. प्रथमतः देशासाठीच्या धोरण  बनवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना जास्तीत जास्ती समाविष्ट करणे गरजेचे आहे. सॅनिटरी पॅड्स, स्त्रियांची अंतर्वस्त्रे आणि मासिक पाळीच्या उपयोगी वस्तूंना कर मुक्त करून त्या मोफत देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या जास्तीत जास्त स्त्रिया आणि तृतीयपंथी लोकांपर्यंत पोहोचतील. अत्यावश्यक सेवेतील मासिक पाळीला सामोरे जाणाऱ्यांना मोठेपणाचा दर्जा देऊन त्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला हवे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मासिक पाळी हा एक 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज आहे असेही या चर्चासत्रात मांडले गेले.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेIndiaभारतkenyaकेनिया