डेली सोप नको रे बाबा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 01:31 IST2016-03-04T08:26:26+5:302016-03-04T01:31:46+5:30
मृण्मयीने अग्निहोत्री, कुंकू या सुपरहिट मालिकादेखील केल्या आहेत

डेली सोप नको रे बाबा!
क यार काळजात घुसली, नटसम्राट, आंधळी कोंशिबिर, पुणे व्हिया बिहार यांसारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपट देणारी मृण्मयी देशपांडे म्हणते डेली सोप नको रे बाबा! याविषयी लोकमत सीएनएक्सने तिला विचारले असता, मृण्मयी म्हणते, कुंकु ही मालिका संपताच क्षणी हिंदी मालिकेसाठी कित्येक आॅफर आल्या होत्या. तसेच तिथून विचारण्यात ही आले होते की, मॅडम तुमची मालिका संपली आता तरी हो म्हणा. यावरदेखील मी ठामच होती. असो.यापूर्वी मृण्मयीने अग्निहोत्री, कुंकू या सुपरहिट मालिकादेखील केल्या आहेत. पण यानंतर तिने एके से एक मराठी सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच आता ती दिग्दर्शनाकडे वळली असताना म्हणून कदाचित मृण्मयीची लहान पडदयावर येण्याची इच्छा नसावी.