(Image Credit : standard.co.uk)
तुम्ही हे नेहमीच ऐकत असता की, कमी झोपणे किंवा पुरेशी झोप न घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जास्त झोपणंही तेवढंच नुकसानकारक आहे. याचे नुकसान केवळ शरीरालाच नाही तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतात. जर तुम्ही रोज ७ ते ८ तासांपेक्षा अधिक झोपत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्या आणि आजारांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊ या होऊ शकतात समस्या....
९ ते १० तास झोप नुकसानकारक
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जे लोक ९ ते १० तास झोपतात, त्यांना झोपेशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांनाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
लवकर मृत्यूचं कारण
१३ वर्ष जुन्या एका रिसर्चनुसार असं समोर आलं आहे की, जे लोक फार जास्त झोपतात, त्यांना कमी वयातच मृत्यूचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला जास्त झोपण्याच्या सवयीसोबतच डायबिटीस आणि हार्ट डिजीज असेल तर हा धोका आणखी जास्त वाढतो.
महिलांमध्ये धोका
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिला दररोज ९ ते ११ तास झोपतात, त्यांच्यात ८ तास झोपणाऱ्या महिलांच्या तुलनेत कोरॉनरी हार्ट डिजीज होण्याचा धोका अधिक वाढतो. पण याचं कारण समोर येऊ शकलं नाही. हा रिसर्च ७२ हजार महिलांवर करण्यात आला होता.
सतत डोकेदुखी
प्रमाणापेक्षा जास्त झोपणाऱ्या लोकांमध्ये डोकेदुखी समस्या नेहमीच बघायला मिळते. असं मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर प्रभावित झाल्याने होतं. जे लोक दिवसा अधिक झोपतात, त्यांच्यात ही समस्या रात्री झोपणाऱ्यांच्या तुलनेत अधिक बघायला मिळते.
लठ्ठपणा
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जे लोक दररोज ९ ते १० तास किंवा त्यापेक्षा अधिक झोप घेतात. त्यांची ही सवय लागोपाठ ६ वर्ष राहिल्यास त्यांच्यात लठ्ठपणा वाढण्याचा धोका २१ टक्क्यांनी अधिक असतो.
डायबिटीस
आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जास्त झोपल्यानेही डायबिटीसचा धोका वाढतो. द अमेरिकन डायबिटीसमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांना जास्त वेळ झोपून राहण्याची इच्छा होते, ज्यांना बेडवरून न उठण्याची तीव्र इच्छा होते, अशा लोकांना टाइप-२ डायबिटीसचा धोका फार जास्त असतो.
डिप्रेशन
झोप न येण्याच्या समस्येचा संबंध सामान्यपणे तणावाशी असतो. डिप्रेशनने पीडित जवळपास १५ टक्के लोक फार जास्त झोपतात. जास्त वेळ झोपण्याची त्यांची ही सवय त्यांची समस्या अधिक वाढू शकतात.