शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:59 IST

Curd with Sugar vs Curd with Salt: आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे.

Curd with Sugar vs Curd with Salt: जास्तीत जास्त लोकांना दही खाणं आवडतं. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अनेकांना असाही प्रश्न पडतो की, दही साखरेसोबत खावं की मीठ टाकून खावं? प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे.

दह्यासोबत मीठ

जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही दह्यासोबत साखर अजिबात खाऊ नका. असात मिठच जास्त चांगला पर्याय ठरतं. पण दह्यासोबत मीठ खाणं  हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्याशिवाय मिठामध्ये अनेक अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर मीठ दह्यात टाकलं तर दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. सोबतच मीठ घातलेल्या दह्याचं जास्त सेवन केल्याने हायपरटेंशनची समस्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे या दोन गोष्टी एकत्र करणं नुकसानकारक ठरतं.

साखर आणि दही

दह्यात साखर टाकून खाणं पचन तंत्राच्या दृष्टीने चांगलं असतं. याने दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होत नाही. याने पोटातील जळजळही शांत होते. पण दह्यात साखर टाकून खाल्ल्याने वजन वेगाने वाढतं. कारण यात कॅलरी जास्त असतात. तसेच डायबिटीसच्या रूग्णांसाठीही हे कॉम्बिनेशन योग्य नाही. अशात साखर असो वा मीठ दोघांचे आपापले फायदे आणि नुकसान आहेत. त्यामुळे यांचं सेवन करताना काळजी घेणं महत्वाचं आाहे.

कसं करावं दह्याचं सेवन?

दह्या थोड्या प्रमाणात मीठ किंवा साखर मिक्स करून फार काही नुकसान होत नाही. पण जर तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणाची समस्या असेल तर याचं सेवन टाळावं किंवा कमी करावं. एक्सपर्ट सांगतात की, दही मीठ आणि साखरेशिवाय खाणं सगळ्यात चांगला पर्याय आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स