शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दही की ताक?, आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय?; आयुर्वेदानं दूर केल्यात सगळ्या शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:29 IST

खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी काय आहे अधिक आरोग्यदायी? दही की ताक?

दुग्धजन्य अथवा डेअरी प्रोडक्ट्समध्ये दही आणि ताक यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दुधापासून तयार केलेले दह्यात मोठ्या प्रमाणावर प्रथिने, प्रोबायोटिक्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात. तसेच, दह्याला घुसळून ताक तयार केले जाते. ताकालाही आयुर्वेदात एक विशेष महत्व आहे.

खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी काय आहे अधिक आरोग्यदायी? दही की ताक?

दही -दुधापासून दही बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी बॅक्टेरियामुळे लॅक्टोज अर्थात दुधातील साखरेचे लॅक्टिक अॅसीडमध्ये रुपांतर होते. यामुळे दह्याला आंबट चव येते आणि ते विशेष बनते.

दह्याचे आरोग्यदायी फायदे -दही हा probiotics अर्थात प्रतिजैविकाचा अथवा उपयुक्त बॅक्टेरियाचा एक उत्तम सोर्स आहे. यामुळे पचन क्रिया चांगली राहण्यास मदत होते आणि पोषक तत्वेही मिळतात. महत्वाचे म्हणजे दह्यात उच्च प्रतिचे प्रोटीन्स देखील प्रमाणावर असतात. जे स्नायू आणि एकूणच शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. याशिवाय, दह्यात लक्षणीय प्रमाणात कॅल्शियमही असते. ज्यामुले आपली हाडे आणि दात मजबूत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

रोगप्रतिकार शक्ती वाढते -दह्यामध्ये प्रतिजैविके (Probiotics) असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते आणि पचन क्रियाही सुधारते. 

ताक आणि त्याचे आरोग्यदायी फायदे - ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे पचन क्रिया चांगली राहते अर्थात ते पचनाला मदत करते आणि पोट चांगले ठेवते. महत्वाचे म्हणजे, अनेकवेळा अपचासारखी समस्या अथवा अॅसिडिटी दूर ठेवण्यासाठीही हे घेतले जाते. दह्या प्रमाणेच ताकातही प्रोबायोटिक्स असतात. जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचन क्रिया चांगली होण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत अन् फॅट्स देखील कमी - महत्वाचे म्हणजे ताक हा अनेक आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. यात कॅल्शियम, व्हिटॅमीन B12, रिबोफ्लेविन आणि फॉस्फरसचा समावेश होतो. याशिवाय दुधाच्या तुलनेत ताकामध्ये फॅट्सचे प्रमाणही कमी असते. ताक हे एक हायड्रेटिंग पेयही आहे. विशेष म्हणजे, ताकामध्ये चांगल्या प्रमाणावर कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते. जे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासठी मदत करते.  

दही की ताक? आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय? - दही आणि ताकाचा विचार करता, ताक हा दह्याला एक उत्तम आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला पर्याय असल्याचे आयुर्वेदाने म्हटले आहे. तसेच, ताकासोबत जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर यांसारख्या मसाल्यांचा वापर केल्याने ताकाचा केवळ स्वादच वाढत नाही, तर त्याचे आरोग्य फायदे देखील वाढवतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealthy Diet Planआहार योजनाParenting Tipsपालकत्व