शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Health tips: स्वयंपाक घरातील 'हा' मसाला पोटदुखी आणि गंभीर आजारांवर आहे रामबाण, अत्यतं उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 09:56 IST

जिऱ्यामध्ये आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे इतके औषधी गुणधर्म (Cumin Medicinal Benefits) आहेत की, आयुर्वेदामध्ये जिऱ्याला औषधीदेखील म्हणले जाते. तर आज आपण याच जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी (Cumin Benefits) काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत.

भारतातील अनेक पदार्थ असे आहेत की, ज्यामध्ये फोडणी दिली जाते आणि त्यानंतर त्या पदार्थांची चव आणखी वाढते. या फोडणीमध्ये कांदा, लसूण असे नसले तरी चालते मात्र एक गोष्ट नक्कीच असते आणि ते म्हणजे जिरे. जिऱ्याची चव आणि त्याचा सुगंध जेवण अधिक चविष्ट बनवते. जिऱ्याला एक मसाला (Cumin Seeds) म्हणून वापरले जाते. परंतु जिऱ्यामध्ये आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे इतके औषधी गुणधर्म (Cumin Medicinal Benefits) आहेत की, आयुर्वेदामध्ये जिऱ्याला औषधीदेखील म्हणले जाते. तर आज आपण याच जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी (Cumin Benefits) काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत.

पोटाच्या समस्यांवर प्रभावी उपायपोटाच्या समस्यांवर (Cumin For Stomach Problems) जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे. जिऱ्याच्या पाण्यात आवश्यक तेल असते जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करते. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच गॅसच्या समस्येवरही जिरे सर्वात फायदेशीर घरगुती उपाय मानला जातो. यासाठी एक चमचा जिरे, छोटा अर्धा चमचा आलं आणि चिमुटभर सेंधा मीठ एकत्र बारीक करून घ्या आणि जेवणाआधी गरम पाण्यात घालून ते प्या.

आंबट ढेकर, गॅसच्या समस्येसाठी उपयुक्तजिऱ्यामुळे पचनास मदत होते, आतडे उत्तेजित होतात आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून (Cumin For Gases)आराम मिळतो. याशिवाय आंबट ढेकर येणे, गॅस किंवा अपचन झाल्यास जिरे भाजून खाल्ल्याने आराम मिळतो. यासाठी एक चमचा जिरे एका पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात एक ग्लास पाणी घाला आणि पाच मिनिटे उकळू द्या. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि दिवसातून दोन वेळा हे कोमट पाणी प्या.

मासिक पाळीच्या वेदनांवर उपयुक्ततुम्हाला मासिक पाळी (Cumin Benefits During Periods) दरम्यान वेदना होत असतील आणि तुम्हाला औषधांची मदत घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी जिरे खूप उपयुक्त ठरू शकतात. जिरे, अँटिस्पास्मोडिक आणि अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते खाल्ल्याने वेदनापासून आराम मिळतो. यासाठी 50 ग्राम जिरे भाजून घ्या आणि त्यात 20 ग्राम गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. मासिक पाळीच्या दोन ते तीन दिवस आधी या गोळ्या खाल्ल्यास तुम्हाला वेदना कमी होतील.

आईचे दूध वाढवण्यासाठी उपयुक्तहरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, नव मातांसाठी आवश्यक असलेल्या लोहाने जिरे समृध्द असतात. यामुळे आईचे दूध वाढवण्यास (Cumin To Increase Breast Milk) मदत होते. यासाठी एक चमचा जिरे भाजून घ्या. त्यानंतर ते एक ग्लास दूधात घाला. या मिश्रणात चवीनुसार साखर घाला आणि काही दिवस हे ड्रिंक प्या.

तुम्हीही जिऱ्याच्या मदतीने या 4 समस्यांवर सहज मात करू शकता. परंतु तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्या असतील तर हा उपाय करून पाहण्याआधी एकदा तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स