'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:22 AM2019-07-21T11:22:58+5:302019-07-21T11:30:04+5:30

पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो.

Critical stage of dengue symptoms that the dengue has reached the critical stage | 'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर

'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर

Next

(Image Credit : bayanmall.org)

पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. एवढचं नाही तर, पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सध्या देशभरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातलं असून अनेक रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं आढळून येत आहेत. अनेकांना डेंग्यूमुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. पण प्रत्येकवेळी डेंग्यू घातक ठरत नाही. जर सुरुवातीच्या स्टेजला या आजाराची लक्षणं ओळखता आली तर, डेंग्यूवर उपचार करणं सहज शक्य होतं. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा लक्षणांबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला डेंग्यूचा आजाराने गंभीर रूप घेतलं आहे, हे समजणं शक्य होईल... 

या दिवसांमध्ये वाढतात डेंग्यूचे डास

पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त किटकांच्या प्रजननाचा काळ असतो. ज्यामुळे या दिवसांमध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे डेंग्यूचा व्हायरस आणि त्यांचा संसर्ग होण्याची शक्यताही दुप्पटीने वाढते. ज्यामुळे डेंग्यू पसरण्याची शक्यता आणखी वाढते. 

डेंग्यूची 'क्रिटिकल स्टेज' (Critical stage of dengue)

डेंग्यूच्या घातक स्टेजमध्ये प्लेटलेट्स काउंट फार कमी होतो. ज्यामुळे रूग्णाच्या आरोग्यासोबतच त्याच्या जीवालाही धोका असतो. पण प्रत्येकवेळी डेंग्यला घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांनीही तुम्ही डेंग्यूवर नियंत्रण मिळवू शकता. 

डेंग्यूचं घातक लक्षण

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेंग्यूची लागण जाल्यानंतर 3 ते 7 दिवसांनंतर योग्य उपचार नाही घेतले तर हा फार गंभीर रूप धारण करू शकतो. अनेकदा या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीराचं तापमान कमी होऊ लागतं, हे लक्षणं पटकन लक्षात येत नाही. अनेकदा रूग्णाचा ताप निवळून तो बरा होत असल्याचे वाटते. पण अनेकदा हा गैरसमज ठरू शकतो. हे कदाचित डेंग्यूचं घातक लक्षण ठरू शकतं. 

डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं :

  • पोटदुखी
  • सतत उलट्या होणं किंवा उलटीमधून रक्त पडणं
  • हिरड्यांमधून रक्त येणं
  • श्वास घेण्यास त्रास होणं 
  • लठ्ठपणा आणि थकवा 

 

वरील लक्षणांपैकी एकजरी लक्षण रूग्णामध्ये आढळून आलं तर अजिबात वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्षं करू नये, असं करणं रूग्णाच्या जीवावरही बेतू शकतं. 

टिप : वरील माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शरीरिक क्षमता ही वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Critical stage of dengue symptoms that the dengue has reached the critical stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.