शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गाईचे की म्हशीचे कोणते दूध तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर? घ्या जाणून सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:00 IST

बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्‍याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…

दूध हे बर्‍याच पोषक घटकांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. गाय आणि म्हशीशिवाय शेळी, उंट आणि मेंढीचे दूधही प्यायलेले जाते. परंतु, बहुतांश लोक केवळ गाय आणि म्हशीचेच दूध वापरतात.

अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा मनात हा प्रश्न येतो की, आपण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे? बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्‍याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…

गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये फरक काय?गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनास हलके आणि कमी चरबीयुक्त आहे. तसेच, गायीचे दुध सहज पचते आणि यामुळेच गायीचे दूध मुलांना पिण्यास दिले जाते. त्याच वेळी म्हशीचे दुध मलईयुक्त आणि जाड असते, म्हणून चीज, खीर, कुल्फी, दही, तूप अशा जड वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर गाईच्या दुधापासून रसगुल्ला, रसमलाई इत्यादी बनवल्या जातात. गायीचे दूध १-२ दिवसातच सेवन करावे, तर म्हशीचे दूध अनेक प्रकारे, बरेच दिवस साठवून ठेवता येते.

त्याच वेळी जर, आपण दुधामध्ये असलेल्या घटकांच्या आधारावर तुलना केली, तर म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात. तसेच, जास्त चरबी असल्यामुळे म्हशीच्या दुधातही कॅलरी जास्त असतात. गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण अधिक, घनतेचे प्रमाण कमी आणि 90% दूध पाण्यापासून बनलेले आहे. म्हशीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात. पोषक घटकांच्या आधारे जाणून घेऊया यातील फरक…

फॅटगाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा फट्स कमी प्रमाणात असतात. याचमुळे, गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते. गायीच्या दुधात ३-४ टक्के फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८ टक्के फॅट्स असतात.

प्रथिनेम्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा १० ते ११ टक्के अधिक प्रथिने असतात. प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही.

कोलेस्ट्रॉलम्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते, म्हणूनच हे पीसीओडी, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगले असल्याचे सिद्ध होते.

कॅलरीहे स्पष्ट आहे की, म्हशीच्या दुधात कॅलरी जास्त असतात. कारण, त्यात प्रथिने आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. एक कप म्हशीच्या दुधात २३७ कॅलरी असतात, तर एका कप गाईच्या दुधात १४८ कॅलरीज असतात.

दोन्ही निष्कर्ष पहिले असता असे म्हणता येईल की, दोन्ही प्रकारचे दूध आपल्यासाठी फायदेशीर आहेत आणि आपल्या गरजेनुसार कोणते दूध प्यावे हे आपण स्वतः ठरवू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स