शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी, क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 09:32 IST

Coronavirus : द लॅन्सेट जर्नलच्या मते, कोरोना व्हायरसच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कोव्हॅक्सिन ही लस 65.2 टक्के प्रभावी आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर  (Coronavirus) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, असे असले तरीही कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट  (Delta Variant) चिंतेचा विषय बनला आहे. भारतातील दुसरी लाट याचाच परिणाम होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे याविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या भारतीय लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित झाला आहे.

द लॅन्सेट जर्नलच्या मते, कोरोना व्हायरसच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कोव्हॅक्सिन ही लस 65.2 टक्के प्रभावी आहे. देशात आणि जगात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही चिंतेचा विषय बनला आहे. तसेच, भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमागे डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण असल्याचे मानले जाते.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी 77.8 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाच्या गंभीर आजारापासून (गंभीर लक्षणात्मक कोरोनाची प्रकरणे) संरक्षण करण्यासाठी कोव्हॅक्सिन 93.4 टक्के प्रभावी आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 63.6% प्रभावी आहे. 

गंभीर AEFI (लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची गंभीर प्रकरणे) फक्त 0.5% पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. भारतीय लस कोव्हॅक्सिन SARS-CoV-2 व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटविरोधात 70.8 टक्के संरक्षण प्रदान करते. भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोव्हॅक्सिन विकसित केली आहे.

दरम्यान, मेडिकल जर्नलने म्हटले आहे की, डेल्टा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने लसीशी संबंधित कोणत्याही सुरक्षेची चिंता व्यक्त केलेली नाही. फेज-3 चाचणीमधील परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी केलेल्या या अभ्यासात भारतातील 25 ठिकाणी 25,800 स्वयंसेवकांचा समावेश होता.

फ्रान्समध्ये पाचवी, जर्मनीत चौथी लाट! डेल्टा व्हायरसने चिंता वाढविलीरशियानंतर आता फ्रान्समध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ब्रिटन, रशिया आणि जर्मनीनंतर तिथे लाट येऊ लागली आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिवर वेरन यांनी सांगितले की, पाचव्या लाटेची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे रशियामध्ये 83 टक्के हॉस्पिटलमधील बेड भरलेले आहेत. तसेच 12 क्षेत्रांतील काही हॉस्पिटलमध्ये केवळ दोन ते तीन दिवसांचाच ऑक्सिजन उरला आहे. तर जर्मनीमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य