Coronavirus in world live update india on 3rd number now in most cases who says bad times ahead | धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना

धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना

अमेरिकेत कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ब्राजिल आणि भारतातही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.  रविवारी कोरोना संक्रमणाचे १ लाख ८० हजार केस समोर आल्या आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या चोविस तासात ३६०० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ५ लाख ३६ हजाारांवर पोहोचला आहे.

रविवारी अमेरिकेत ४४ हजार, ब्राजिलमध्ये २६ हजार तर भारतात २४ हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत. स्पेनच्या उत्तर- पश्चिमी क्षेत्रातील गलिसियामध्ये कोविड 19 चे संक्रमण वेगाने पसरत आहे. श्रीलंकेतही कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे ११५  दिवस बंद ठेवल्यानंतर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 

कोरोना व्हायरसचे सगळ्यात घातक आणि भयावह रुप अजूनही दिसलेलं नाही अशी माहिती WHO नं दिली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे पाच लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. WHO चे प्रमुख टेडरॉस एडनहॅम यांनी सांगितले की, काही देशांमध्ये माहामारी वेगाने पसरत आहे. जसजसं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे. तसतशी कोरोनाची दुसरी लाटसुद्धा येत आहे. तर काही देशांमध्ये संक्रमणाचे रौद्र रुप अजूनही दिसलेले नाही. 

WHO कडून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणांवर बंदी घालण्यात आली होती. मलेरिया विरोधी औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे कॉम्बिनेशनचे डोस देण्यावर पुन्हा बंदी आणली आहे. डब्ल्यूएचओने म्हटल्यानुसार या औषधांच्या वापराने मृत्यूदरामध्ये कोणतीही घट झालेली नाही. 
डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही.

उलट मृत्यूदर वाढत चालला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यूएचओ शनिवारी याबाबत खुलासा केला आहे. औषधांच्या चाचणीवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार या औषधांच्या वापरावर बंदी आणण्यात येत आहे.  गेल्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत असल्याने क्लिनिकल ट्रायलवर बंदी आणली होती. 

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus in world live update india on 3rd number now in most cases who says bad times ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.