CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 11:14 IST2023-04-07T11:13:24+5:302023-04-07T11:14:24+5:30
वेळीच सावधानता बाळगली नाही तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.

CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले
देशात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून गेल्या २४ तासांतील आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वेळीच सावधानता बाळगली नाही तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.
World Health Day 2023 : कोरोनानंतर जगभरात वाढले ६ गंभीर आजार, जीवघेणाा त्रास देणारे हे आजार कोणते?
गेल्या २४ तासांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6050 झाली आहे. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपेक्षा ही १३ टक्क्यांनी जास्त आहे. आजच्या आकड्यामुळे देशात सक्रीय रुग्णसंख्या 28,303 झाली आहे. गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला कोरोना रुग्णांची संख्या 6,298 होती. आजची आकडेवारी गेल्या २०३ दिवसांपेक्षा अधिक आहे.
गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूमुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 5,30,943 झाली आहे. महाराष्ट्रात तीन, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नव्या कोरोनाची लक्षणं नेमकी काय?
XBB 1.16 व्हेरिअंटची सामान्य लक्षणांमध्ये श्वसना संदर्भातील आजार, डोकेदुखी, घशात खवखव, नाक बंद होणं, ताप आणि मांसपेशी दुखणे यांचा समावेश आहे. या व्हायरसच्या संक्रमणामुळे पचन संस्थेवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे लागण झालेल्या व्यक्तीला डायरियाची समस्या उद्भवते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि नियमीत स्वरुपात हात स्वच्छ धुणे यासोबतच कोरोना लसीकरण देखील अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी अजूनही कोरोना लसीकरणाचा तिसरा डोस घेतलेला नाही अशांना तिसरा डोस लवकरात लवकर घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जे आधीपासूनच इतर सहव्याधींनी ग्रासले आहेत अशा व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी.