शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आता हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका होणार कमी; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 17:04 IST

CoronaVirus News & Latest Updates : एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

कोरोना व्हायरसने गेल्या १० ते ११ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या हसण्यातून, खोकण्यातून किंवा शिंकण्यातून संक्रमित ड्रॉपलेट्स उडाल्यामुळे कोरोना संक्रमण इतरांपर्यंत पोहोचते. मात्र आता हवेमार्फत पसरणाऱ्या कोरोनाचा (Aerosolised Coronavirus) धोकाही नाकारता येत नाही. म्हणजे कोरोनाव्हायरस असलेले तोंडातील ड्रॉपलेट्स हवेत विशिष्ट कालावधीसाठी राहतात आणि विशिष्ट ठिकाणापर्यंत तरंगत जातात. ज्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो. या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा हा प्रश्न निर्माण होतो.

सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.  सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन अनेक ठिकाणी पूर्णपणे होताना दिसून येत नाही. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात असलं  तरी घरी तेवढ्या प्रमाणात लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत नाहीत. अशावेळी  एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे.

सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी अनेक वर्षांपासून यूव्हीसी प्रक्रिया वापरली जाते पण त्यामुळे मोतीबिंदू किंवा त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.  मात्र त्या तुलनेत कमी क्षमतेची  far-ultraviolet C (UVC) सुरक्षित असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. कमी क्षमतेचं फार-अल्ट्राव्हायोलेट लायटिंग C (UVC) वापरल्यास खोलीतील हवा निर्जंतुक करता येऊ शकते ज्यामुळे रुममध्ये व्हेंटिलेशनमुळे होणाऱ्या निर्जंतुकीकरणाच्या तुलनेत ५० ते ८५  टक्क्यांची वाढ होऊ शकते असं कॉम्प्यूटेशनल मॉडेलिंगच्या माध्यमातून दिसून आलं आहे. 

हिवाळ्यात मेथीच्या सेवनाचे 'हे' ७ फायदे वाचून व्हाल अवाक्, आजारांपासून लांब राहण्याचा सोपा फंडा

यूकेमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातील लिआंग यांग तज्ज्ञ हे या अभ्यासातील प्रमुख संशोधक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार. जिथं सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही अशा बंद खोल्यांमध्ये कोरोना विषाणू एअरोसोलच्या माध्यमातून पसरून संक्रमित करू शकतो. आता फार-यूव्हीसी लायटिंगमुळे सुरक्षित, कमी खर्चाच्या पद्धतीने कोरोनाचं संक्रमण रोखण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटल्स, वैद्यकीय सेवा केंद्र अशा ठिकाणी सी (यूव्हीसी) चा निर्जंतुकीकरणासाठी वापर करता येऊ शकतो.

तुम्हीसुद्धा मधाच्या नावाखाली चायनीज शुगर सिरप विकत घेताय का? फसवणूक होण्याआधीच जाणून घ्या सत्य

पुढे त्यांनी सांगितले की, ''या पद्धतीनं हवेतील विषाणूंचा नाश करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जिथं हवा खेळती राहू शकत नाही. तिथं फार-यूव्हीसी इल्युमिनेशनचा कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी तितकाच उपयोग होईल जितका N95  मास्कचा  होतो.'' असं मत या संशोधनाबाबत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याResearchसंशोधन