चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:27 PM2020-06-25T12:27:43+5:302020-06-25T12:35:11+5:30

CoronaVirus News : आपण बुट आणि चपला वापरल्यानंतर स्वच्छ करायला नेहमी विसरतो.

Coronavirus survive on shoes tips to disinfect your footwear after coming from outside | चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी

चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी

Next

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. आर्थिक नुकसानांचा सामना करावा लागत असल्यामुळे अनेक देशातील लॉकडाऊन उठवण्यात आले आहेत. अनलॉक ०.१ मध्ये अनेक कार्यालयं, दुकानं सुरू झाली आहेत. परंतू कोरोनाचा धोका मात्र कमी झालेला नाही. अशा स्थितीत तुम्ही बाहेर वावरताना घरात कोरोनाचं संक्रमण घेऊन येऊ शकता. चपला, कपड्यांमार्फत विषाणूंचा घरात प्रवेश होऊ  शकतो. आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही आपली काळजी घेऊ शकता. 

सोशल डिस्टेंसिंगसोबतच कमीतकमी २० सेकंद हात धुणं गरजेचं आहे. पण आपण बुट आणि चपला वापरल्यानंतर स्वच्छ करायला नेहमी विसरतो. सीडीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार  आजार पसरवत असलेले किटाणू आणि विषाणू दिर्घकाळापर्यंत चपलांवर जीवंत राहू शकतात. त्यासाठी आपल्या चपला साफ करणं महत्वाचं आहे. कामासाठी बाहेर पडल्यानंतर, बाहेरून घरी आल्यानंतर कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. या जीवघेण्या व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवले नाही तर संपूर्ण कुटुंबाला संक्रमण होण्याची शक्यता  आहे.

चपला काढायाची जागी निश्चित ठेवा. रोज त्याच ठिकाणी चपला काढून ठेवा. 

घरात आणि बाहेर वापरण्याच्या चपला वेगवेगळ्या असाव्यात. 

हातांनी शुज काढण्याची अनेकांना सवय असते. तुम्हीसुद्धा हाताने शुज काढत असाल तर हातांना सॅनिटायजर लावून किंवा ग्लोव्हज घालून बुट काढा. 

तळव्याची घाण  किंवा किटाणूंचा संपर्क जमिनीशी आल्यास संक्रमण पसरू शकतं. त्यामुळे दरवाज्याजवळ पायपुसणी असायलाच हवी. 

बुट गरम पाण्याने धुवा, शक्य नसल्यास गरम पाण्यात एखादं कापड घालून पिळून घ्या  आणि या कापडाने बुट पुसा.

डिसइंफेक्टिंग वाइप्सचा वापरही तुम्ही करू शकता. बुटं साफ करत असताना हात स्वच्छ धुवून घ्या.

साबणाचे पाणी बनवून या पाण्याचा स्प्रे तयार करा आणि बुटांवर शिंपडा.

तुम्ही रोज बाहेर जात असाल तर आलटून पालटून शुज वापरण्याच प्रयत्न करा. 

याशिवाय मास्कचा वापर न चुकता करा. वॉशेबल मास्क असल्यास उत्तम ठरेल. 

CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण

धक्कादायक! ताण तणाव जास्त असल्यास वाढतो कोरोनाच्या संक्रमणाचा धोका, तज्ज्ञांचा खुलासा

Web Title: Coronavirus survive on shoes tips to disinfect your footwear after coming from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.