शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:34 IST

COVID-19 चं संक्रमण झालं असेल तर कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना ही लक्षणे तर दिसतातच सोबत आणखीही काही लक्षणे समोर आली आहेत.

COVID-19 : कोरोना व्हायरस जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये एखाद्या वादळाप्रमाणे थैमान घालत आहे. लोक यापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत. पण अजूनही लोकांच्या मनात प्रश्न आहे की, त्यांना संक्रमण झाल्यास सर्वात आधी काय होईल? दरम्यान, द अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चनुसार, ज्या लोकांना कोरोना व्हायरस आपला शिकार बनवतो त्या लोकांमध्ये पहिला संकेत जुलाबसारखी पचनासंबंधी समस्या बघायला मिळाली.

याची सामान्यपणे सुरवातीची लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.

ताप

कोरडा खोकला

श्वास घेण्यास त्रास होणे

छातीत वेदना

निमोनिया

जगभरातील तज्ज्ञ या व्हायरससंबंधी माहिती मिळवण्यासाठी मेहनत करत आहेत. जसजसे रिसर्च केले जात आहेत तसतशी लक्षणांची यादी वाढत आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोनाची लागण झालेल्या 204 रूग्णांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला.

यात वैज्ञानिकांना आढळून आलं की, व्हायरसने संक्रमित होऊन हॉस्पिटलमध्ये आलेल्या रूग्णांपैकी 48.5 टक्के लोकांना जुलाब, उलटी आणि पोटदुखीसारख्या पचनासंबंधी समस्या होत्या. रिसर्चमधून समोर आलं की, कोरोनाचे श्वासासंबंधी लक्षणांआधी व्यक्तीमध्ये पचनासंबंधी समस्या दिसतात. ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या होत्या त्यांना गंभीर रूपाने समस्यांचा सामना करावा लागला.

जुलाब आणि उलटीची होते समस्या

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये अमेरिकेआधी कोरोना रूग्णांवर प्रकाशित एका केस रिपोर्टमधून समोर आलं की, त्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वातआधी जुलाब झाले आणि पोटात समस्या होऊ लागली होती. दुसऱ्या एका रिसर्चमधून समोर आले की, व्हायरस मलत्यागाच्या रूपात बाहेर येतो, ज्याप्रमाणे जुना व्हायरस म्हणजे SARS and MERS बाहेर येत होते.

पचनक्रिया होते प्रभावित

द अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचे को-एडीटर इन चीन आणि एडी ब्रेनन एम.आर. स्पीगल म्हणाले की, कोरोनाने पीडित रूग्णांमध्ये पचनासंबंधी लक्षणांची भूमिका आणि प्रभवा समजून घेण्यासाठी आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. 

या रिसर्चमध्ये पचनासंबंधी लक्षणे असलेल्या व्हायरसने संक्रमित रूग्णांमध्ये मृत्यू दर अधिक आढळून आला. तर ज्यांना पचनासंबंधी समस्या नव्हती त्यांचा मृत्यू दर कमी दिसला. त्यामुळे जुलाबसारख्या लक्षणांवर जोर दिला जात आहे. जेणेकरून संक्रमणाच्या सुरूवातीच्या लक्षणांसोबत श्वसनासंबंधी लक्षण विकसित होऊ नये आणि त्यांची माहिती आधीच मिळवावी. याने कोरोनाची माहिती लगेच मिळेल. इतरांना वाचवता येईल.

पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी

- फायबरचं प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. धान्य, फळं, भाज्या आणि शेंगाचं सेवन करा.

- भरपूर पाणी प्यावे.

- धुम्रपान, अधिक कॅफीन आणि अल्कोहोलपासून दूर रहा.

- पपई, डाळिंब, संत्री, आंबे, पेरू अशी फळं खावीत. याने पचनक्रिया सुधारते.

- तसेच रोज सकाळी एक्सरसाइज करावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्यAmericaअमेरिका