शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

Corona चा नवा खेळ; बरे झालेले लोक 'या' गंभीर आजाराचे होत आहेत शिकार, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 10:08 IST

Coronavirus : एक्सपर्टनुसार,  आतापर्यंत कोविडच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या यादीत मधुमेहाने म्हणजेच डायबिटीसने पीडित लोक सर्वात वर आहेत. 

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. भारतासह अनेक जगभरातील अनेक देशात बिकट स्थिती आहे. या महामारीत जे लोक आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत त्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कोविडच्या म्यूटेशननंतर (Covid Mutation) नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. जे अधिक संक्रामक आहेत. एक्सपर्टनुसार,  आतापर्यंत कोविडच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या यादीत मधुमेहाने म्हणजेच डायबिटीसने (Diabetes) पीडित लोक सर्वात वर आहेत. 

नुकत्याच करण्यात आलेल्या काही रिसर्चमधून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे जे लोक कोविडमधून रिकव्हर झाले आहेत त्यांच्यात आता डायबिटीसची लक्षणे दिसू लागली आहेत. किंग्स कॉलेज लंडनचे(King college of london) एमडी प्राध्यापक फ्रान्सेस्को रूबिनो यांनी डायबिटीस आणि कोरोना यांच्यातील संबंधाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांच्यानुसार, जे लोक कोविडच्या मेजर लक्षणांचे शिकार झाले आहेत त्यांच्यात डायबिटीसही आढळत आहे.  (हे पण वाचा : Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?)

काय सांगतो रिसर्च?

कोविडसोबत डायबिटीसच्या कनेक्शनबाबत बराच वैज्ञानिक डेटा समोर आला आहे. ज्यात वेगवेगळे विचार आहेत. आकडेवारीनुसार, जे लोक टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचे शिकार आहेत त्यांना कोविडचे गंभीर लक्षणे दिसत आहेत. हेल्थ एक्सपर्टनुसार, कोविडसाठी टाइप २ डायबिटीस एक मोठा फॅक्टर असू शकतो.

वैज्ञानिकांनी चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाच्या ७३३७ रूग्णांवर एक अभ्यास केला. ज्यातील ९५२ रूग्ण आधीपासून टाइप २ डायबिटीसने ग्रस्त होते. रिसर्चमधून समोर आलं की, टाइप डायबिटीस असलेल्या कोरोना रूग्णांना जास्त मेडिकल ट्रिटमेंटी गरज असते आणि त्यांच्यात मृत्यु दरही जास्त असतो. (हे पण वाचा : धोका वाढला! फुफ्फुसांव्यतिरिक्त 'या' अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; अशी ओळखा लक्षणं)

ग्लूकोज लेव्हलवर लक्ष देण्याची गरज

अमेरिकन डायबिटीस असोसिएशननुसार, सामान्यपणेही शुगरसारख्या आजारात रूग्ण फ्लूसारख्या संक्रमणासोबत निपटण्या दरम्यान अनेक प्रकारचा धोका पत्करतात. त्यमुळे कोविड त्यांच्यासाठी घातक ठरतो. तज्ज्ञांनुसार डायबिटीसने पीडित लोकांना सर्वाधिक धोका कोविड -१९ चा आहे.

ग्लूकोजच्या लेव्हलमध्ये चढ-उतार झाल्यावर हा धोका आणखी वाढतो. जर ग्लूकोजचं प्रमाण वाढलं तर आपली इम्यूनिटी कमजोर होते. ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो आणि संक्रमणापासून लढण्याची क्षमताही गमावतो. सोप्या शब्दात सांगायचं तर ग्लूकोजचा स्तर कमी झाल्यानेच डायबिटीस असलेल्या कोविड संक्रमित रूग्णांना अधिक धोका असतो. त्यामुळे ग्लूकोज नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.

डायबिटीसची आकडेवारी वाढली

महामारी दरम्यान डायबिटीसच्या रूग्णांची आकडेवारी वाढल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, काही लोकांमध्ये कोविडचं संक्रमण झाल्यावर डायबिटीसची लक्षणे दिसत आहेत.

साइंटिफिक अमेरिकनच्या रिपोर्टनुसार, कोविड १९ चे अनेक रूग्ण ज्यांच्यात डायबिटीसची लक्षणे नव्हती. त्यांच्यात अचानक डायबिटीसची लक्षणे दिसू लागली आहेत. हे लक्षात घेता इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडन आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीने एक CoviDiab रजिस्ट्री तयार केली आहे. ज्यात डॉक्टरांना अशा रूग्णांची माहिती द्यायची होती ज्यांना कोविडनंतर डायबिटीसची लक्षणे आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdiabetesमधुमेहResearchसंशोधनHealthआरोग्यEnglandइंग्लंड