Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग नाही फायदेशीर? रिसर्चमधून करण्यात आला दावा....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:54 AM2021-04-26T10:54:18+5:302021-04-26T10:56:12+5:30

Coronavirus : मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील वैज्ञानिकांचा दावा आहे की, अंतराने काही फरक पडणार नाही.

Coronavirus : Study on risk of being exposed to covid 19 says 6 feet distance make no difference | Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग नाही फायदेशीर? रिसर्चमधून करण्यात आला दावा....

Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग नाही फायदेशीर? रिसर्चमधून करण्यात आला दावा....

googlenewsNext

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO यावर जोर आली आहे की, कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी ६ फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे.  म्हणजे दोन लोकांमधील अंतर ६ फूट असेल तर तुम्हाला संक्रमणाचा धोका कमी असले. WHO ची ही गाइडलाईन जगभरात अवलंबली जात आहे. मात्र, एका रिसर्चमधून या गाइडलाईनवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील वैज्ञानिकांचा दावा आहे की, अंतराने काही फरक पडणार नाही. मग ते ६ फूट असो वा ६० फूट. खासकरून तेव्हा जेव्हा व्यक्ती घरासारख्या इनडोअर ठिकाणी असेल.

कुणीही नाही सेफ?

‘द डेली मेल’ च्या रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी अमेरिकेतील सीडीसी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे गेल्यावर्षी जारी केलेल्या Covid-19 च्या गाइडलाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात म्हटले होते की, कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी इनडोर आणि आउटडोर दोन्ही ठिकाणांवर लोकांमध्ये सहा फुटाचं अंतर असलं पाहिजे. यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या प्रोसिडींगमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, मिश्रित ठिकाणांवर हवेतून पसरणाऱ्या व्हायरसपासून कुणीही सुरक्षित नाही. भलेही ते ६ फुटाचं अंतर असो वा ६० फुटाचं असो. भलेही त्यांनी मास्क लावला असो.

काय म्हणाले वैज्ञानिक?

वैज्ञानिकांनी या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी ट्रान्समिशनला प्रभावित करणाऱ्या वेगवेगळ्या कारणांचं विश्लेषण केलं. जसे की, एअर फिल्टरेशन, इम्यूनायजेशन,वेगवेगळे स्ट्रेन आणि इनडोअर ठिकाणांवर घालवला गेलेला वेळ. त्यासोबतच वैज्ञानिकांनी श्वसन प्रक्रिया जसे की, श्वास घेणे, जेवण करणे, बोलणं किंवा गाणं गाणे इत्यादींवर लक्ष दिलं. 

MIT चे प्राद्यापक मार्टिन बॅंजेटने सीएनबीसीसोबत बोलताना सांगितले की, ६ फुटाचा तसा काही फायदा नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या इनडोअर ठिकाणी असाल. ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा व्यक्ती मास्क लावते तेव्हा ती वेगाने श्वास घेते आणि सोडते. अशात त्यांच्याकडून सोडण्यात आलेला श्वास रूममध्ये आजूबाजूला पसरतो. ज्याने दूर उभ्या असलेल्या व्यक्तीलाही शिकार करू शकतो'.

WHO ने लक्ष दिलं नाही

मार्टिन बॅंजेट म्हणाले की, CDC आणि WHO ने गाइडलाईन जारी करताना इनडोअर ठिकाणांवर घालवल्या जाणाऱ्या वेळेवर लक्ष दिलं नाही. जे फार गरजेचं आहे. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, अनेकदा जागा मोठी असते. तिथे व्हेंटीलेशन चांगलं असतं. लोकांकडून एकत्र घालवण्यात आलेला वेळही जास्त नसतो. अशात अशाप्रकारची ठिकाणे जर पूर्ण क्षमतेसोबत खुले राहतील तर कोणताही धोका नसेल.

Web Title: Coronavirus : Study on risk of being exposed to covid 19 says 6 feet distance make no difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.