शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

कोरोनातून बरे झाल्यानंतर 'या' टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 09:47 IST

coronavirus : कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनापासून बरे झाले असाल तर या व्हायरसने तुमच्या शरीरावर किती नुकसान केले आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणे महत्वाचे आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज भारतात साडे तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. (coronavirus patient must get these test done post recovery) 

दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन आरटीपीसीआरच्या (RTPCR)  टेस्ट रिपोर्टला (Test Report) सुद्धा चकमा देत आहे. कारण, बर्‍याच वेळा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतो,  परंतु टेस्ट रिपोर्टमध्ये निगेटिव्ह (Corona Negative Report) येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही कोरोनापासून बरे झाले असाल तर या व्हायरसने तुमच्या शरीरावर किती नुकसान केले आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणे महत्वाचे आहे. कोणत्या टेस्ट करायच्या आहे, ते पाहूया... 

अँटीबॉडी टेस्टडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान होते. विशेषत: कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करतो. यासाठी तुम्हाला अँटीबॉडी टेस्ट करणे महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे, हे या टेस्टद्वारे माहीत होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही टेस्ट करावी. 

(कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 'मे'च्या मध्यावर 'उद्रेक' होणार; राष्ट्रीय समितीनं यापूर्वीच केंद्राला दिला होता इशारा)

CBC Testसीबीसी टेस्ट म्हणजे कंम्प्लीट ब्लड काऊंट टेस्ट, शरीरातील वेगवेगळ्या पेशींची तपासणी करण्यासाठी टेस्ट केली जाते. यामुळे रुग्णाला कोरोना संसर्गाविरूद्ध त्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देत आहे, याचा अंदाज येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही चाचणी लोकांसाठी खूप महत्वाची आहे.

शुगर टेस्टशुगर आणि कोलेस्ट्रोल टेस्ट देखील खूप महत्वाची आहे. शुगर असलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. कोरोनादरम्यान बर्‍याच वेळा लोकांच्या शरीरात शुगरची पातळी वाढते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट देखील करण्यास सांगितले जाते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य