शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 11:12 IST

CoronaVirus News & latest Updates : सोमवारी लॉकडाऊन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आणि गंभीर स्थिती लक्षात घेता शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी शनिवारी देशभरात पुन्हा एकदा महिन्याभराचा लॉकडाऊन घोषित केला आहे. बोरिस जॉनसन यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मंत्रिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  चर्चा केली. सोमवारी लॉकडाऊन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात होता.  दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आणि गंभीर स्थिती लक्षात घेता  शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. 

गुरूवारपासून सक्तीचा असेल लॉकडाऊन

देशभरात गुरूवारपासून लॉकडाऊनचे पालन करणं सक्तीचे असणार आहे. यासाठी नियमांचीही घोषणा करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. आपातकालिन स्थितीत किंवा खास कारणासाठी घराबाहेर पडण्याची सूट मिळणार आहे. शाळा, कॉलेज, व्यायामशाळा या कामांसाठी लोक घराबाहेर जाऊ शकतात. अत्यावश्यक वस्तू आणि सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.  २ डिसेंबरपर्यंत ही बंधनं असणार आहेत.

या नवीन लॉकडाऊन अंतर्गत बार, पब,  हॉटेल्स पूर्णपणे बंद राहतील. पण  लोक हॉटेल्समधून घरी जेवण घेऊन जाऊ शकतात. मनोरंजनाची सगळी ठिकाणं बंद असणार आहेत. बोरिस जॉनसन यांनी सांगितले की, ''नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करावी लागेल. कारण याशिवाय अन्य कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही. आता निसर्गापुढे आपण नतमस्तक झालो आहोत.'' वैज्ञानिक सल्लागारांच्यामते युरोपासह अनेक देशात अजूनही कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेनने रात्रीच्यावेळी कर्फ्यू लागू केला होता. तसेच, देशात आणीबाणी घोषित केली होती. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले होते की, सकाळी ११ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील. म्हणजेच या कालावधीत लोकांना घराबाहेर पडायला बंदी असेल. हे निर्बंध रविवारपासून अंमलात आले  होते. दुसरीकडे, कोरोना प्रकरणात होणारी वाढ पाहता श्रीलंकेने सर्वाधिक गर्दी असलेल्या १६ प्रवासी रेल्वे गाड्याही थांबविल्या होत्या.

स्पेनमध्ये आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन विविध क्षेत्रातील हालचालींवर निर्बंध घालू शकते, असे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले होते. तसेच, संसदेला नवीन नियमांची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यास सांगणार, जे सध्या १५ दिवस आहेत. या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान स्पेनची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे कडक लॉकडाउन लागू केला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दुप्पट सुरक्षा देतील हे २ उपाय; शास्त्रज्ञांचा दावा

इतर युरोपियन प्रदेशांप्रमाणेच स्पेन सुद्धा संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत सापडला आहे. इटलीमध्येही रविवारपासून नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले होते. सरकारने सांगितले की प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशाच्या आरोग्य सेवांवरचा ताण वाढला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये विक्रमी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ म्हणाले होते की, रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान वेगवेगळ्या प्रदेशांना त्यांच्या वेळेत काही बदल करायचे असतील तर ते एका तासासाठी पुढे किंवा मागे करू शकतात. प्रादेशिक नेते एका जिल्ह्यापासून दुसर्‍या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवरील निर्बंधाचा निर्णय घेतील. केवळ काम किंवा आरोग्याशी संबंधित गरजा मिळू शकतील. आम्ही अत्यंत कठीण काळातून जात आहोत. गेल्या ५० वर्षातील ही सर्वात गंभीर परिस्थिती आहे. पॉझिटिव्ह बातमी! आता १२ ते १८ वयोगटातील तरूणांवर होणार लसीची चाचणी; जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचा निर्णय

टॅग्स :Englandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य