शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

चिंताजनक! २०२४ पर्यंत सगळ्यांपर्यंत कोरोनाची लस पोहोचणं अशक्य; सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 5:38 PM

CoronaVirus News & Latest Updates : २०२४ च्या शेवटापर्यंत संपूर्ण जगभरातील लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात लस तयार होऊ शकणार नाही.  याशिवाय त्यांनी भारतातील सगळ्या लोकांपर्यंत लस पुरवण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीनं हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना विषाणूंची लस तयार करण्याासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारतातील लस निर्मीती करत असलेल्या कंपनीकडून एक  चिंताजनक मत व्यक्त करण्यात आलं आहे. जगभरातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी सांगितले की, २०२४ च्या शेवटापर्यंत संपूर्ण जगभरातील लोकांना पुरेल  एवढ्या प्रमाणात लस तयार होऊ शकणार नाही.  याशिवाय त्यांनी भारतातील सगळ्या लोकांपर्यंत लस पुरवण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे. 

फायनेंशियल टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार अदार पूनावाला यांनी  सांगितले की, ''औषध निर्मीती करत असलेल्या कंपन्या कमी कालावधीत संपूर्ण जगभराला लस पुरवू शकत नाहीत. त्या प्रमाणात उत्पादन क्षमता विकसित झालेली नाही. पृथ्वीवरील सर्व लोकांना लस पुरवण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो.  तसंच एका व्यक्तीसाठी जर लसीचे २ डोस लागत असतील संपूर्ण जगभरासाठी १५ अब्ज डोजची गरज भासू शकेल.''

कोल्ड स्टोरेज सिस्टिमचा अभाव

आदर पुनावाला यांनी भारतातील १.४ अब्ज लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. कारण लसीच्या वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी कोल्ड चेन सिस्टिम सध्या उपलब्ध नाही. लस तयार केल्यानंतर कमी तापमानाच्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवावी  लागते.  एका जागेवरून इतर ठिकाणी नेण्यासाठी कोल्ड सिस्टिम असणं गरजेचं असतं. मागच्या आठवड्यात कोल्ड चेन सिस्टिमबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञ डॉ. फाऊची यांनीही चिंता व्यक्त केली होती. 

आदर पुनावाला म्हणाले की, ''भारतात ४० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देता येऊ शकेल अशी कोणतीही योजना नाही. उत्पादन केल्यानंतरही  साठवून ठेवण्यासाठी  समस्या उद्भवू शकते.'' पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) कोरोना लसीच्या उत्पादनासाठी पाच आंतरराष्ट्रीय कंपन्याशी व्यवहार केला आहे. यात एक्स्ट्राझेनेका आणि नोवावॅक्सन कंपन्यांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

रशियानं ब्राझिलला लसीचे ५ कोटी डोज पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. rt.com मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडानं सांगितले की नोव्हेंबरमध्ये स्पुतनीक व्ही  या लसीचे वितरण सुरू होणार आहे. ब्राझिलकडून आता अंतिम मंजूरी येणं बाकी आहे.  कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त प्रभावी असलेल्या देशांपैकी एक ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 4,315,858 पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 131,274 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जास्त मृतांच्या संख्येत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित रुग्णसंख्येमध्ये अमेरिका आणि भारतानंतर ब्राझिलचा क्रमांक येतो. रशियानं कोरोना लसीच्या कोट्यावधी डोजसाठी ब्राझिलमधील अनेक राज्यांशी करार केला आहे.

आता राष्ट्रीय स्तरावर ब्राझिल रशियाशी करार करेल अशी आशा अनेकांना आहे. अनेक देशांकडून  स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले.  रशियानं दिलेल्या माहितीनुसा लस तयार करण्यासाठी आतापर्यंत आधारभूत संरचना पहिल्यापासूनच तयार होती. त्यामुळे कमी वेळात लस तयार करणं शक्य झालं.  RDIF नं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस लॉन्च केल्यापासून वेगवेगळ्या देशातून मागणीला सुरूवात झाली आहे. वेगवेगळ्या देशांतून आतापर्यंत अरबो डोसची ऑर्डर मिळाली आहे. 

हे पण वाचा-

कोरोना लढाईत जलदगतीने उपचार?; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार

CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य