CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:33 AM2020-06-21T02:33:08+5:302020-06-21T07:25:06+5:30

CoronaVirus News : लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (IITR) ने मेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने एक निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले आहे.

CoronaVirus News : Now the N95 mask, PPE kit will be sterile; Can be used 20 times | CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार

CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 87 लाखांवर गेली असून साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. देशभरात कोरोनाचे 14,516 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ही तब्बल तीन लाख 95 हजारांवर पोहोचली आहे. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनासंदर्भात नवनवीन संशोधन करण्यात येत आहे. 

कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांची सेवा करताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांना पीपीई किट आणि मास्क देण्यात आले आहे. सामान्यत: N95 मास्क आणि पीपीई किट एकदाच वापरण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय या दोन्ही गोष्टींची योग्य ती विल्हेवाट लावताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पण आता हे थोडं सोपं होणार आहे. कारण लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (IITR) ने मेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने एक निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले आहे.

कोरोनाच्या संकटात या खास निर्जंतुकीकरण यंत्राच्या मदतीने कमीतकमी 20 वेळा N95 मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरण्यायोग्य होणार आहे. कोरोना चाचणी केंद्रांसाठी आणि रुग्णालयांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यंत्रामुळे उपचार करताना येणारा खर्चही थोडा कमी होणार आहे. दररोज नवीन वस्तू वापरण्याऐवजी यंत्राच्या मदतीने एकच मास्क आणि किट काही दिवस वापरणं सहज शक्य होणार आहे. आयआयटीआरचे संचालक आलोक धवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स जोधपूर आणि संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था (SGPGIMS) ने निर्जंतुकीकरण यंत्राची चाचणी यांनी केली आहे.


निर्जंतुकीकरण यंत्राचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. पाण्याचा वापर करून 65 ते 70 डिग्री सेल्सिअसवर हे यंत्र पीपीई किट आणि मास्क निर्जंतूक करतं. निर्जंतुकीकरण प्रकिया पूर्ण होण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटांचा अवधी लागतो. सीएसआयआरने विविध रुग्णालय व चाचणी केंद्रांवर सामान्य वापरासाठी या यंत्राला मान्यता दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा पद्धतीचे खास यंत्र विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम केलेल्या संशोधकांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या नव्या यंत्राची माहिती दिली. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या  लढ्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी अनेक उपयुक्त उपकरणं तयार केली आहेत. या हायटेक वस्तू आणि उपकरणं बाजारात उपलब्धही होऊ लागली आहेत. परवडणारी कोरोना टेस्ट किट्स, स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर, डिजिटल स्टेथोस्कोप, निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, आयसोलेशन वॉर्डांसाठी विल्हेवाट लावता येण्याजोगे बांबूचे फर्निचर, रुग्णालयांसाठी संसर्गरोधक कापड, अशी अत्यंत उपयुक्त साधनं आयआयटींमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात तयार केली आहेत. दिल्ली आयआयटी निर्मित कोविड-१९ टेस्ट किटला तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरीही दिली आहे. त्यानंतर  आता, या उपकरणांची व्यापारी तत्त्वावर निर्मिती सुरू व्हावी आणि ती विक्रीसाठी बाजारात यावीत, यादृष्टीनंही तयारी झालीय. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून किंवा पेटंट स्वतःकडेच ठेवत काही नामांकित कंपन्यांना निर्मिती परवाना द्यायचं आयआयटींनी ठरवलंय.

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे. मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Now the N95 mask, PPE kit will be sterile; Can be used 20 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app