शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना संक्रमणाविरूध्द लढणाऱ्या सायकोटीनपासून शरीराला असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 10:15 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरुध्द लढत असलेले सायटोकाईन प्रोटीन शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

कोरोनाचा प्रसार जगभरात वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन जगभरातून २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.  कोरोनावर लस किंवा औषधं शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.  संशोधनादरम्यान कोरोनाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरुध्द लढत असलेले सायटोकाईन प्रोटीन शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

चीनमधील आर्मी मेडिकल युनिव्हरसिटीच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरातील इम्यून सिस्टीम डॅमेज झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती  कमी होऊन रुग्णांची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जर्नल फ्रंटीअर इन इम्युनोलॉजी यात नमुद केलेल्या माहितीनुसार शरीरात टी सेल्स पांढऱ्या पेशींप्रमाणे असतात.  टी सेल्सच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो.

एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, सायकोटीन प्रोटीन इन्फेक्शनला रोखण्यासाठी काम करत असतं. पण  हे प्रोटीन जास्त प्रमाणात वाढल्यानंतर शरीरातील पेशींसाठी नुकसानकारक ठरू शकतं.  याला सायंटिफीक भाषेत ‘साइटोकॉइन स्टॉर्म’ म्हणतात. कोरोना टी सेल्सवर आक्रमण न करता सायकोटाइनच्या उत्सर्जनावर जास्त भर देत असल्यामुळे टी सेल्सवर परिणाम होऊन टी सेल्स आपोआप नष्ट होऊ लागतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. 

यासाठी उपचारादररम्यान टी सेल्सकडे लक्ष देणं गरजेंच आहे. असा  दावा संशोधकांनी केला आहे. आत्तापर्यंत केल्या गेलेल्या उपचारपद्धतीत श्वसनप्रणालीवर अधिक जोर दिला जात होता. योंनवेन चेन या संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार ज्या रुग्णांच्या शरीरात टि सेल्सची कमतरता आहे. अशा रुग्णांवर अधिक लक्ष देणं गरजेंच आहे. कारण टी सेल्स सुरूवातीपासून संक्रमणाविरूध्द लढतात. विशेष म्हणजे या सेल्यच्या एंटीबॉडीज सुद्धा तयार झालेल्या नसतात. (हे पण वाचा-छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय)

शास्रज्ञांनी ५२२ रुग्णांवर केलेल्या संशोधनातून असा दावा केला आहे की, टी सेल्सचा वापर करून इन्फेक्शन आणि आजाराबाबात अधिक माहिती मिळू शकते. यातून नवीन औषधांची निर्मीती केली जाऊ शकते. जेणेकरून टी  सेल्सची संख्या वाढून कार्यक्षमता वाढवली जाऊ शकते. (हे पण वाचा-कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या